कोकण

पाऊस गेला, सिंधुदुर्गात गुलाबी थंडीची चाहूल 

राजेश सरकारे

कणकवली/सावंतवाडी : हवेत चांगलाच गारठा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गवासीयांना थंडीची चाहूल लागली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत सकाळच्या सत्रात धुक्‍याची चादर पसरलेली पाहायला मिळत असून, हवेतल्या गारव्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे. पारा 22 अंशापर्यंत खाली गेला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 4989.40 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे भातशेतीचेही चित्र चांगले होते; मात्र मॉन्सूनच्या भारतातील आगमनापूर्वी निसर्ग वादळाने दिलेला तडाखा आणि त्यानंतर परतीच्या पावसाने जिल्ह्यात पूरस्थिती आणली. यात भातशेतीची प्रचंड हानी झाली. त्यामुळे कधी एकदा पाऊस निघून जातो, अशा मानसिकता जिल्हावासीयांची होती. 
जिल्ह्यात 28 ऑक्‍टोबरपासून मॉन्सूनने एक्‍झिट घेतली आणि आकाश मोकळे झाले आहे. सध्या जिल्ह्याच्या सर्वच भागांत सकाळच्या सत्रात सर्वत्र धुकं पसरलेलं पाहायला मिळत आहे. डोंगर भागात धुक्‍याचे प्रमाण अधिक आहे. मुंबई गोवा महामार्गावर धुकं असल्याने सकाळी वाहनांना दिवे लावून प्रवास करावा लागत होता. 

सिंधुदुर्गमधील तापमानही 22 ते 30 अंश सेल्सिअस इतकं खाली उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेले चार थंडी आणि धुकं असल्याने कोकणातला निसर्गाचं रुपडे पालटलं आहे. या पालटलेल्या निसर्ग डोळ्यांत साठवण्यासाठी अनेकांचे पाय कोकणाकडे वळावेत, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांतून व्यक्‍त होत आहे. कारण कोरोनामुळे गेले आठ महिने जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. 

आंबा व काजू पिकांना होणार फायदा
गेली दोन वर्षे मॉन्सूनचे उशिरा आगमन आणि तेवढाच परतीच्या पावसाला होत असलेला उशीर पाहता थंडीचा कालावधी पंधरा ते वीस दिवसांनी पुढे ढकलला जायचा. याचा परिणाम जिल्ह्यातील आंबा, काजू यासारख्या फलोत्पादनवर होत असे; मात्र यंदा नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात योग्यवेळी थंडीची चाहूल लागल्याने याचा फायदा आंबा व काजू पिकांना होणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बागायतदार समाधानी आहे.


 संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT