Collector Laxmi narayan Mishra Message for kokan people 
कोकण

'कोरोनाच्या महामारीत अडकले, हा त्यांचा दोष नाही त्यांना चांगली वागणूक द्या'....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनामुळे ठिकठिकाणी अडकलेल्यांना मुळ गावी पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र साथीच्या विळख्यात अडकलेल्यांचा यामध्ये काही दोष नाही. संत गाडगेबाबांनी सांगितले आहे की, सर्व माणसांत देव आहे. तर मग आपण या देवाला कोरोनाच्या महामारीतून वाचवू या.

रत्नागिरीत येणार्‍यांना आदरपूर्वक आणि सन्माची वागणूक देऊ या. वेळ जाईल, थोडा त्रास होईल, एखादा पॉझिटिव निघाला पण घाबरण्याची गरज नाही. सर्व यंत्रणा सज्ज आहे. आरोग्य, पोलिस, महसुल आदी त्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. आपण किती दिवस लपून राहायचे, यामध्ये सर्वांनी सामील होऊ या संकटावर मात करू या, असे आत्मविश्‍वासाचे आणि माणुसकीचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.

मुंबई, पुण्याहून येणार्‍यांना आदरपूर्वक वागणूक द्या

जिल्हाधिकार्‍यांनी  महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व जनतेशी सोशल मिडियाद्वारे आवाहन केले. ते म्हणाले, 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिवस म्हणजे अभिमानाचा दिवस. या निमित्ताने एक गोष्ट माझ्या लक्षात आली की,  कोरोनाच्या संकटापासून आपण किती दिवस लपून राहणार आहे.  मुंबई, पुणे, नागपूर आदी मोठी शहरे, याच्या पूर्ण विळख्यात आली आहेत. रत्नागिरीतील रहिवशी म्हणून आपलेही काही कर्तव्य आणि जबाबदारी आहे. अभिमान वाढविण्यासाठी रत्नागिरीकरांनी अनेक प्रसंगी मोठी भुमिका घेतली आहे आणि योगदान दिले आहे.

लोकांमद्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र ​

चाकरमानी म्हणून उदरनिर्वाहासाठी अनेकजण मुंबई, पुणे आदी ठिकाणी आहेत. शासनाने अडकलेल्या लोकांना मुळ गावी पाठविण्याचा मोठा निर्णय घेतला. लोकांमद्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या लोकांच्या सुरक्षेसाठी आपले ही काही कर्तव्य आहे. ग्रामपंचायत, पालिका, लोकप्रतिनिधी आदींनी मुुंबई, पुण्याहून रत्नागिरी येणार्‍यांना आदरपूर्वक आणि सन्माची वागणूक देऊ या. साथीच्या विळख्यात अडकण्यास त्यांचा काही दोष नाही. मात्र बाधित क्षेत्रातून येणार नाही, याची खात्री प्रशासन करीत आहे. येणार्‍यांची आरोग्य चाचणी, गावात फिरणार नाही, प्रादुर्भाव होणार नाही ही खबरदारी घेतील जाणार आहे. गरज पाडल्यास कायद्याचा बडगा दाखवू. कोणताही प्रकारचा जाती भेद, धर्मभेद घडणार नाही. कोणही कायद्याला हातात घेणार नाही,याची खात्री आहे.एखादा पॉझिटिव निघाला तरी घाबरण्याची गरज नाही.

हम होंगे कामयाब एक दिन

आपल्याकडे आरोग्य, अत्यावश्यक सेवा, अन्न - धान्य, भाजीपाला आदीचा पुरवठ्यात खंड होणार नाही. लघु उद्योग सुरू राहातील गरजूंना रोजगार मिळेल. कोणाला काही अडचण असेल तर आम्हाला कळवा. पोलिस, आरोग्य, ग्रामपंचायत,  महसुल आदी अहोरात्र काम करत आहे. त्याच्या सोबत आपण सामील होऊन जगावर आलेल्या संकटावर मात करू. सहभागी व्हा, एक दिवस नक्की यश येईल. मन मे है विश्‍वास, पुरा है विश्‍वास, हम होंगे कामयाब एक दिन, अशा विश्‍वास जिल्हाधिकार्‍यांना व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT