College Student Moti Lake esakal
कोकण

Sindhudurg Crime : मोती तलावात पडून महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू; तन्वीचा मृतदेह पाहून आईनं फोडला हंबरडा

काल तिचा मृतदेह सापडला. हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबतचे गूढ उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

सकाळ डिजिटल टीम

तन्वीला तीन बहिणी आहेत. ती एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत होती.

सावंतवाडी : शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीचा (College Student) मोती तलावात (Moti Lake) पडून मृत्यू झाला. तन्वी विजय कांबळे (वय १७, मूळ रा. चंदगड, सध्या रा. न्यू-खासकिलवाडा, सावंतवाडी) असे तिचे नावे आहे. ही घटना मंगळवार (ता. २१) रात्री उशिरा घडली.

काल तिचा मृतदेह सापडला. हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबतचे गूढ उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : येथील राजवाड्यासमोर मोती तलावात (ता. २१) रात्री कोणतरी महिला पडल्याचे काहींनी पाहिले.

काही नागरिकांच्या समोर ती तलावाच्या पाण्यात गटांगळ्या खात बुडाली; मात्र ती नेमकी कोण हे स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांना कळविण्यात आले; मात्र शोध मोहीम राबविण्यात आली नव्हती. दरम्यान, आज सकाळी एक मृतदेह तलावात तरंगताना नागरिकांना दिसून आला. सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, पालिका कर्मचारी चंद्रकांत व नितीन कदम यांनी बोटीच्या साहाय्याने मोती तलावात उतरून मृतदेह बाहेर काढला.

यानंतर तिची ओळख पटली. ती न्यू खासकिलवाडा भागात भाडेतत्त्‍वावरील खोलीत राहणारी तन्वी कांबळे असल्याचे स्पष्ट झाले. तन्वीचे कुटुंब मूळचे चंदगडचे. तिची आई रोजंदारी करते. तन्वीला तीन बहिणी आहेत. ती एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. ती तलावात नेमकी कशी पडली, हे उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

तिचे मामा रमाकांत काशीराम जाधव (रा. सालईवाडा) यांनी वर्दी दिली. सावंतवाडी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहायक निरीक्षक सरदार पाटील, संतोष गलोले, विजय केरकर, धनुजा ठाकूर, होमगार्ड गणेश वेंगुर्लेकर यांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर तन्वीचे पार्थिव चंदगड येथील मूळ गावी नेण्यात आले.

आई अत्यवस्थ

तन्वी मंगळवार रात्रीपासून बेपत्ता होती. मृतदेह पाहून तन्वीच्या आईने हंबरडा फोडला. त्या तेथेच अत्यवस्थ झाल्या. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT