Harnai sea Ratnagiri esakal
कोकण

Harnai Beach : डॉक्टर व्हायचं स्वप्न अधुरंच राहिलं! घरी चिठ्ठी लिहून काॅलेज तरुणीनं संपवलं जीवन

दीक्षा सध्या चिपळूणमधील महाविद्यालयात १२ विज्ञान शाखेतून शिक्षण घेत होती.

राधेश लिंगायत

दीक्षाने चिपळुणातील घरातून बाहेर पडताना एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. मी घर सोडून जात आहे. माझा शोध घेऊ नये, असे त्यामध्ये लिहिले असल्याचे समजते.

हर्णै : हर्णै-पाळंदे बीच (Harnai Beach) येथे कोंडजाईकड्यासमोर समुद्र किनारी काल (शनिवार) सकाळी एका तरुणीचा मृतदेह येथील ग्रामस्थांना दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दीक्षा मिलिंद माने (वय १८) असे तिचे नाव असून, चिपळुणातील एका महाविद्यालयात ती बारावीत शिकत होती. शुक्रवारी कॉलेजला जाते, असे सांगून बाहेर पडलेली दीक्षा घरी परत आलीच नाही.

पाळंदे येथील रहिवासी अनिल आरेकर हे सकाळी समुद्रावर फिरायला गेले होते. त्यावेळी वाळूमध्ये रुतलेल्या अवस्थेत त्यांना एक मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना कळवली. हर्णै पोलिसांनी या घटनेची खबर दापोली पोलिसांना (Dapoli Police) देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह ताब्यात घेऊन दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणला.

तरुणीच्या पाठीवर एक बॅग होती. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बागेमध्ये काही मिळतेय का पाहिले, परंतु काहीही मिळाले नाही. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील हरवलेल्या व्यक्तींसदर्भात तक्रारींचा ऑनलाईन शोध घेण्यात आला, तेव्हा चिपळूण येथील दीक्षा मिलिंद माने (वय १८) ही तरुणी शुक्रवारी संध्याकाळी हरवली असल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी सदर मृतदेहाचा फोटो चिपळूण पोलिसांना पाठवल्यावर खात्री झाली.

चिपळूण पोलिसांनी नातेवाइकांना याची माहिती देऊन दापोली पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. त्यावेळी हा मृतदेह दीक्षा मानेचाच आहे, याची खात्री नातेवाइकांकडून झाली, अशी माहिती हर्णै पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक डी. डी. पवार यांनी दिली. शुक्रवारी सकाळी घरामध्ये कॉलेजमध्ये जाते म्हणून सांगून निघून गेली, परंतु ती परत आलीच नाही. म्हणून शोधाशोध झाली. त्यानंतर नातेवाइकांनी चिपळूण पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.

तिने शुक्रवारी सायंकाळी हर्णै समुद्रकिनारी येऊन आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक डी. डी. पवार व दिलीप नवाले करत आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

दीक्षाला डॉक्टर व्हायची इच्छा होती

दीक्षाच्या कुटुंबामध्ये तिचे आई-वडील, अन्य दोन बहिणी आहेत. माने कुटुंब मूळचे वाकवली (ता. दापोली) येथील आहे, परंतु सध्या ओझरवाडी (ता. चिपळूण) येथे नोकरीनिमित्त राहात होते. दीक्षा ही सगळ्यात मोठी होती. ती सध्या चिपळूणमधील महाविद्यालयात १२ विज्ञान शाखेतून शिक्षण घेत होती. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ती चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाली होती. ती अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होती. तिला डॉक्टर व्हायचे होते.

घरी सापडली चिठ्ठी

दरम्यान, दीक्षाने चिपळुणातील घरातून बाहेर पडताना एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. मी घर सोडून जात आहे. माझा शोध घेऊ नये, असे त्यामध्ये लिहिले असल्याचे समजते. याला पोलिसांनीही दुजोरा दिला असून, दीक्षाच्या आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT