Commission for the Protection of the Rights of the Child letter for mobile network company 
कोकण

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना काढले फर्मान का वाचा....

चंद्रकांत जोशी

रत्नागिरी : आंजर्ले येथे मोबाईल नेटवर्कची सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. लवकर मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधून नेटवर्क सुविधा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पत्र दोनवेळा पाठवूनही नेटवर्क सुविधा सुरू न झाल्याने बालहक्‍क संरक्षण आयोगाने नाराजी व्यक्‍त केली. दोन दिवसात या संदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याचा अहवाल न पाठविल्यास आयोगाच्या कार्यालयात व्यक्‍तीश: उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे लागेल, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
 

दापोली तालुक्‍यातील आंजर्ले येथे मोबाईल नेटवर्कची सुविधा मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार राष्ट्रीय बालहक्‍क संरक्षण आयोगाकडे करण्यात आली. आयडिया कंपनीचा टॉवरही बंद पडला असून बीएसएनएलची सेवाही बंद आहे. या मोबाईल कंपन्यांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही ते मोबाईल सेवा सुरळीत करत नसल्याने आंजर्ले येथील कौमुदी जोशी या विद्यार्थिनीने थेट राष्ट्रीय बालहक्‍क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक आयोगाच्या (ट्राय) अध्यक्षांना राष्ट्रीय बालहक्‍क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी पत्र लिहिले होते तसेच पत्र २१ व २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनाही लिहिले होते; मात्र या पत्राची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली नाही तसेच या संदर्भात कोणताही अहवाल या आयोगालाही पाठविला नसल्याचे आयोगाने जिल्हाधिकारी यांना ३० जुलै रोजी पाठविलेल्या 
पत्रात म्हटले आहे. 

हेही वाचा- मालवण पालिकेच्या इतिहासात प्रथमच उपक्रम, काय आहे तो? वाचा... -
आयोगाच्या अध्यक्षांनी याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी आंजर्ले परिसरात मोबाईल सेवा सुरळीत करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करावेत, असे कळवले आहे. दोन दिवसात याचा अहवालही आयोगाकडे न पाठवल्यास सीआरपीसी कायदा २००५ कलम १४ नुसार आपणास आयोगाच्या कार्यालयात स्वत: उपस्थित राहून या संदर्भात आपले म्हणणे मांडावे लागेल, असेही नमूद केले.

अधिक धोका पोचू शकतो
ऑनलाइन शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अडचणी आल्याने मुलांना त्रास होत आहे. आपण शिक्षणापासून वंचित राहत आहोत, या गोष्टीचा मानसिक ताण येऊन विद्यार्थ्यांना अधिक धोका पोचू शकतो, या शक्‍यतेची गंभीर दखल आयोगाने घेऊन पत्रात तसे नमूद केले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Journey : पुणे-मुंबई हेलिकॉप्टरचा प्रवास ७० हजारांनी महाग; प्रवास १२ मिनिटांनी लांबला

Mangalwedha News : लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात राखीव महिला जागेसाठी दहा इच्छुक महिलांनी खोचला पदर

Bombay High Court : मंत्र्यांची मुले गुन्हे करुन मोकाट फिरतात, तरीही पोलिसांना सापडत नाहीत; मुख्यमंत्री हतबल आहेत? हायकोर्टाची विचारणा

Daund Accident : दौंडमध्ये रोलरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू; मृतदेह अर्धा तास घटनास्थळीच

सोलापूर महापालिकेत ‘एमआयएम’ला मिळणार नाही विरोधी पक्षनेतेपद! सोलापूर महापालिकेतील नगरसेवक म्हणतात, ‘उपमहापौरपद नको रे बाबा’, काय आहे कारण? वाचा...

SCROLL FOR NEXT