कोकण

मोठी बातमी ; 50 बेडचे सेंटर नसेल तर कंपन्या होणार बंद

- राजेश शेळके

रत्नागिरी : उद्योगासाठी लागणारा ऑक्सिजन बंद करून तो आरोग्यासाठी देण्याचे आदेश उद्योजकांना दिले आहेत. कंपनीमध्ये किमान 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करा, असा सूचना दिल्या आहेत. काही मोठ्या कंपन्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र ती व्यवस्था न केल्यास कंपनी बंद करू, असा इशारा कंपन्यांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसोबत गुरुवारी (ता. 22) व्ही.सी. घेतली. त्यामध्ये सर्व उद्योजकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने बाधित कर्मचारी मिळाल्याची माहिती आली होती. त्यावर कंपन्यांना आपल्या स्तरावर तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले आहेत. प्रत्येक कंपनीने 50 बेडचे कोविड संटेर सुरू करायचे आहे. तसेच कर्मचार्‍यांच्या चाचण्या करण्यास सांगितले आहे.

घरडा, लोटेतील काही कंपन्या, फिनोलेक्सने कोविड सेंटर सुरू केले आहे. गद्रे, जेएसडब्ल्यू यांनाही सूचना केल्या आहेत. जेएसडब्ल्यू कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र कोविडे सेंटर न उभारल्यास कंपनी बंद करू अशी ताकीद दिली. त्यामुळे त्यांनीही 50 खाटांचे कोविड सेंटर उभे करण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी 10 टक्के ऑक्सिजन बेड असणार आहेत. त्याची नोंद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असणार आहे. बेड रिकामे असतील तर तेथील स्थानिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.

ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्याची कारवाई सुरू झाली आहे. दहा ड्युरा सिलिंडर ताब्यात घेणार आहोत. घरडा कंपनीत 70, दापोली कृषीभवन येथे 25 बेडची व्यवस्था होत आहे. रत्नागिरी सिव्हिलमध्येही 50 ऑक्सिजन बेड उभारण्याचे काम सुरू आहे. 170 जम्बो सिलिंडर भरण्याचा प्लॅन्ट महिला रुग्णालयात सुरू केला जाणार आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.

घरच्या पद्धतीचे जेवण मिळते

कोविड सेंटरमध्ये चांगल्यापद्धीने आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. बाधित रुग्णांनाही मी प्रत्यक्ष भेटलो. त्यांनीही चांगली प्रतिक्रिया दिली. समाज कल्याणमध्ये बाधितांना जेवणही चांगले दिले जात आहे. शाकाहारी, मांसाहारी जेवण, फळे, दुध अगदी घरच्या पद्धतीने जेवण मिळत असल्याची प्रतिक्रिया रुग्णांनी दिल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT