comparatively horticulturalist increased for this year but the coverage of insurance decreased in kokan
comparatively horticulturalist increased for this year but the coverage of insurance decreased in kokan 
कोकण

यंदा बागायतदारांत वाढ, पण विमा क्षेत्रात मात्र घट

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : हवामानात होणाऱ्या बदलांचा आंबा, काजू उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे बागायतदारांना पीक विमा योजना निश्‍चित लाभदायक ठरू शकते. गेली चार वर्षे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद संमिश्र आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील 24 हजार 306 बागायतदारांनी 14 हजार 788 हेक्‍टरवरील बागांचा विमा उतरवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावणेचार हजार शेतकरी वाढले असले तरीही विमा उतरवलेले क्षेत्र घटले आहे. 

वातावरणाच्या तडाख्यात सापडलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी शासनाने अवेळी पाऊस आणि कमाल तापमान यावर आधारित पीक विमा योजना जाहीर केली. यंदा 2020-21 या वर्षांकरिता विमा उतरवण्यासाठी नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत होती. जिल्ह्यातील 21 हजार 17 आंबा तर 3 हजार 289 काजू बागायतदारांनी विमा उतरवला. त्यात कर्जदार बागायतदारांची संख्या 22 हजार 514 आणि बिगर कर्जदार 1 हजार 792 बागायतदार आहेत. शासनाच्या निकषानुसार शेतकरी हिस्स्यापोटी 9 कोटी 84 लाख 19 हजार 886 रुपये भरण्यात आले. शेतकरी, शासन आणि विमा कंपनी मिळून 196 कोटी 83 लाख रुपये विमा संरक्षित रक्‍कम आहे. 

आंबा, काजूसाठी पिक विमा योजना 2016 - 17 या वर्षात सुरू झाली. पहिल्या वर्षी 15 हजार 69 शेतकऱ्यांनी विमा उतरवला. विमा योजनेचा लाभ घेण्याची कोकणातील शेतकऱ्यांची मानसिकता नाही. तरीही पहिल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अपेक्षित परतावा न मिळाल्याने काही बागायतदारांनी त्यामधून काढता पाय घेतला. 2017 - 18ला लाभार्थी संख्या हजाराने घटली. 2019 - 20ला त्यात मोठी वाढ झाली. या वर्षी विमा उतरवलेल्या शंभर टक्‍के आंबा बागायतदारांना परतावा मिळाला. 

18 हजार 158 शेतकऱ्यांना 84 कोटी 33 लाख रुपये मिळाले. 2020 - 21च्या हंगामाच्या सुरवातीला वातावरणाने रंग दाखवल्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल, असा अंदाज आहे. उत्पन्न घटले तर ते भरून काढण्यासाठी बागायतदारांना विमा परतावा आधार ठरू शकतो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावणेचार हजार बागायतदारांनी अधिक विमा उतरवला आहे; परंतु क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत दीड हजार हेक्‍टरने घटले आहे. गतवर्षी काजू बागायतदारांना म्हणावा तसा लाभ झालेला नव्हता. त्यामुळे तुलनेत यंदा काजू व्यावसायिकांची संख्या कमी झाली आहे. 

वर्ष                  शेतकरी क्षेत्र (हेक्‍टरी)              परतावा 
2016-17       15,069 13,865.67           16 कोटी 27 लाख 
2017-18       14,456 13,861.87           55 कोटी 2 लाख 
2018-19       17,473 15,704.14           12 कोटी 84 लाख 
2019-20       20,897 16,936                84 कोटी 91 लाख 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT