कोकण

रत्नागिरी : लिंगाणा सुळका केला सर; चढाई तीन हजार फूट उंचीवर

दिव्या भोरेची कमाल; सहा तासांत चढाई, गृहरक्षक दलातील पहिली महिला

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील (raigad district) सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला समुद्रापासून तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा(lingana fort) सुळका नाचणे-सुपलवाडी येथील दिव्या संजय भोरे हिने सर केला असून, हे यश मिळवणारी रत्नागिरीच्या गृहरक्षक दलातील (ratnagiir home guard)पहिली महिला जवान ठरली आहे.

दिव्याची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामध्ये वडिलांचे छत्र हरपलेले. असे असताना मोठ्या जिद्दीने स्वतःसमोर ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी नेहमी ती प्रयत्नात असते. दिव्या म्हणाली की, पहाटे ४ वाजता या मोहिमेची सुरुवात मोहारी गावापासून झाली. प्रचंड प्रमाणात थंडी पडलेली, सगळीकडे अंधार पसरलेला असताना चंद्राच्या प्रकाशात वाट चालत होते. ४ वाजून २० मिनिटांनी रायलिंग वठारावरती पोहचले आणि तेथून खऱ्या अर्थाने गिर्यारोहणाची परीक्षा सुरू झाली. गिर्यारोहणाचे साहित्य अंगामध्ये घालून ६ वाजून १० मिनिटांनी चढाईला सुरुवात केली.

चढाई करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. सोसाट्याचा वारा झेलत अतिप्रमाणात थंडी सहन करत चढाई करताना संपूर्ण कस लागला. अशा प्रकारे सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी लिंगाणाच्या शिखरावरती पोहचले. भारत माता की जय, अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत मातृभूमीचा देशाचा तिरंगा फडकवण्याचा मान मला मिळाला. ज्येष्ठ गिर्यारोहक (कै.) मोहन खातू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या माऊंटेनिअर्स असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली. पुणे, हडपसर येथील जय हिंद ट्रेकर्सचे आयोजक गौरव भोकरे व निशांत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून

शालेय शिक्षण पूर्ण करत असताना अनेक खेळात, कार्यक्रमामध्ये ती भाग घेत असे. अॅथलॅटिक्स या वैयक्तिक खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरती खेळून तिने पदके मिळवली आहेत. हे सर्व करत असताना तिने पदवीत्त्युर शिक्षणही पूर्ण केले. २०१९ मध्ये ती महाराष्ट्र गृहरक्षक दलामध्ये रुजू झाली. सध्या या दलात ती कार्यरत असून येथील शहर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहे.

एक नजर

  1. या मोहिमेची सुरुवात - पहाटे ४ वाजता

  2. रायलिंग वठारावरती - ४ वाजून २० मिनिटांनी

  3. चढाईला प्रत्यक्ष सुरुवात - ६ वाजून १० मिनिटांनी

  4. लिंगाणाच्या शिखरावर -सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT