congo fever disease from animal transmitted from people in ratnagiri its dangerous to people 
कोकण

सावधान ! काँगो फिव्हर आजार आता माणसांतही होतोय संक्रमित

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : जनावरांतील ‘काँगो फिव्हर’ हा एक इंडिमिक रोग असून, तो जनावरांतील गोचिडमार्फत माणसांतही संक्रमित होतो. या विषाणूजन्य आजाराचे गुजरात व राजस्थानमध्ये काही रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात जनावरांमध्ये लक्षणे आढळल्यास त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यांत अलीकडेच देवीसदृश लम्पिस स्किन डिसिस या आजारानेही बाधित जनावरे आढळली असून, त्यांच्यावर यशस्वी उपचार पशुसंवर्धन विभागाकडून केले आहेत.

पशुधन विभागाने केलेल्या आवाहनात काँगो हा झुन्यास्टिक स्वरूपाचा जनावरांपासून मानवात होणारा रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव दक्षिण आफ्रिका, कांगो, हंगेरी, चीन, इराण या देशात झाला आहे. हा विषाणू हायलोमा या जातिच्या गोचडीद्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात व बाधित जनावरापासून मानवांमध्ये संक्रमित होतात. या रोगामुळे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या सारख्या पाळीव जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. त्यामुळे बाधित जनावरे व पक्षी विषाणूचे वाहक म्हणून कार्य करतात. अशा जनावरांच्या संपर्कामध्ये आलेल्या मानवांना प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते. या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये अत्यंत घातक असल्याचे दिसून आले आहे.

ताप डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डोळे लाल होणे, त्वचेखाली रक्तस्त्राव, कावीळसारखी लक्षणे दिसून येतात. गुजरातमध्ये काही ठिकाणी याचा प्रादुर्भाव झाला असल्याने राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी जनावरावरील गोचीड यांचे निर्मूलन गोचीडनाशक, औषधांची फवारणी करून घेणे आवश्‍यक आहे. गोचीड बाधित जनावरावरील गोचीड हाताने काढणे, हाताने मारणे टाळावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत केले आहे.

सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्‍यात पशुधनावर देवी सदृश आजाराची (लम्पिस स्किन डिसिस) लागण झाल्याचे प्रकार १५ दिवसांपूर्वी समोर आले होते. गुजरातमधून गडचिरोली व नंतर सिंधुदुर्गात या आजाराची लागण लागल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येते. सध्या या आजाराचा प्रभाव विदर्भ-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहे. सावंतवाडी तालुक्‍यात मळगाव, नेमळे, तळवडे तर वेंगुर्ले तालुक्‍यातील पेंडुर, होडावडे परिसरात गुरांना या आजाराची लागण झाली होती.

प्रतिबंधात्मक लस व नियमित औषोधोपचार केल्यानंतर सात दिवसात या आजाराचा प्रभाव कमी होतो. हा संसर्गजन्य आजार डास, बोचिड, माशी आदींच्या प्रादुर्भावामुळे होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर जनावरांच्या त्वचेवर फोड येऊन ताप, गळ्याच्या त्वचा व पायांना सूज येते. पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या अँटिबायोटिक औषधे व ताप कमी होण्याच्या गोळ्या दिल्यानंतर हा आजार पूर्णतः बरा होतो असे मत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. ज्या ठिकाणी या आजाराची जनावरे सापडली त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी सांगितले.
 

"देवीसदृश लम्पिस स्किन डिसिस या आजाराबाबत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जनावरांना या आजाराची लागण झाल्यास पशुसंवर्धन विभागाशी तत्काळ संपर्क साधावा. जनावरांना काही दिवस गोठ्यातच बंदिस्त ठेवावे."

- डॉ. सचिन धारवडकर, पशुधन विकास अधिकारी

"सर्वांनी काँगो हा रोग कसा होतो? कसा पसरतो? याची अचूक व तंतोतंत माहिती जमविणे, जाणून घेणे, समजावून घेणे गरजेचे आहे. ही माहिती वेळोवेळी प्रदान करणे आवश्‍यक आहे. आपापल्या वाडी, गाव, ग्रुप ग्रामपंचायत येथे जनजागृती करणे ही काळाची गरज आहे."

- विद्यानंद देसाई, पशुधन विकास अधिकारी, वेंगुर्ले
 

असे करा गोचिड नियंत्रण

गोचिड निर्मूलन, नियंत्रण हा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी मेटारिझियम या बुरशीचा वापर करू शकतो. यामुळे गोचिड मरत नाही. पण, गोचिडातील अंडीचा जीवनक्रम केव्हाही मोडू शकतो. सोयाबीन तेलाऐवजी इतर कोणत्याही खाण्याच्या तेलाचा वापर केल्यासही गोचिड नियंत्रण होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

8th Pay Commission: २०२६ पासून पगार वाढणार की वाट पाहावी लागणार? ८व्या वेतन आयोगावर धक्कादायक अपडेट, संसदेत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

"भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते .." जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT