Congress Fight Gram Panchayat Election In Sindhudurg  
कोकण

ग्रामपंचायत निवडणूका लढविण्यासाठी `येथे` काँग्रेसची तयारी

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी बुथ कमिट्यांचे पुर्नगठन करून आगामी ग्रामपंचायत निवडणूका स्वबळावर अथवा महाआघाडीतर्फे लढविणार असल्याची माहिती राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रकाश जैतापकर यांनी आज दिली. 

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेसची मासिक सभा जेष्ठ नेते साईनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथील जिल्हा कॉंग्रेसच्या कार्यालयात झाली. याबाबतची माहिती प्रकाश जैतापकर यांनी देताना आजच्या सभेत बुथ कमिट्याचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. बुथ कमिट्या पुनर्गठीत करून जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी कॉंग्रेसचे पॅनल किंवा शक्‍य त्या ठिकाणी महाआघाडी करून निवडणूका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासकामे करण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जैतापकर यांनी स्पष्ट केले. 

या बैठकीस माजी आमदार पुष्पसेन सावंत, राजू मसुरकर, नागेश मोर्ये, दिलीप नार्वेकर, बाळा गावडे, श्रीकृष्ण तळवडेकर, निता राणे, विभावरी सुकी, सुगंधा साटम आदी पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर यांनी दिली. 

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वंजारे यावेळी पदाधिकारी निवडही झाली. यात महिला आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून साक्षी वंजारे यांची तर सेवादल वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी विजय खाडे याची नियुक्‍ती करण्यात आली.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT