कोकण

चिपळुणात काँग्रेसचे संपर्क कार्यालय सुरू

CD

- ratchl१५१.jpg-
P२४M९०३९२
चिपळूण ः काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांचा सत्कार करताना पदाधिकारी, कार्यकर्ते.
-------------

चिपळुणात काँग्रेसचे संपर्क कार्यालय सुरू

चिपळूण, ता. १५ ः लोकसभा निवडणुकीत बंद असलेले चिपळूणातील काँग्रेसचे संपर्क कार्यालय अखेर नव्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर सुरू झाले आहे. माजी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी राजीनामा दिल्यापासून हे कार्यालय काही महिने बंद होते; मात्र आता तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी सुत्रे हाती घेताच नव्याने दमाने हे कार्यालय सुरू केले आहे.
काही महिन्यापूर्वी प्रशांत यादव यांनी काँग्रेस तालुकाध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. तालुकाध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती; मात्र काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. तालुकाध्यपदी शहा यांची निवड शुक्रवारी जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या निमित्ताने तालुकाध्यक्ष शहा यांचा सत्कार केला. या वेळी तालुकाध्यक्ष शाह म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यावर भर राहील. शहरासह ग्रामीण भागात पक्षाचे संघटनात्मक जाळे उभारून पक्ष घराघरापर्यंत नेण्याचे काम केले जाईल. शहरासह ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आणि अडीअडचणी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यात येतील, असा विश्वास लियाकत शहा यांनी व्यक्त केला. या वेळी महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, नंदा भालेकर, माजी नगरसेविका सफा गोठे, लियाकत शेख, कबीर काद्री, संदीप लवेकर, जीवन रेळेकर, इम्तियाज कडू, रिझवान पटेल, सुरेश राऊत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Milk Union : पुणे दूध संघातील गैरव्यवहारांची चौकशीची टिळेकरांची मागणी; कारवाई करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

Chakur News : चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांचा राजीनामा

Pune Palakhi Sohala: ज्ञानेश्वर-तुकाराम पालख्यांच्या पुण्यातील मुक्कामाची जय्यत तयारी; वारकऱ्यांसाठी निवास, भोजन, स्वच्छतेची चोख व्यवस्था

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

SCROLL FOR NEXT