कोकण

रत्नागिरीत बांधकाम साहित्याची दुकाने 8 दिवस सुरू; उदय सामंत

- राजेश शेळके

रत्नागिरी : तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae)तालुक्यातील किनार्‍याला मोठा तडाखा बसला आहे. घरांचे नुकसान झाल्याने बांधकाम साहित्यांची दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचे तहसीलदार शशिकांत जाधव (Tehsildar Shashikant Jadhav)यांनी स्पष्ट केले. मात्र लेखी आदेश नसल्याने पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास मज्जाव केला. यावरून बाजारपेठेत काहीसा वाद झाला. मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना हे समजतात त्यांनी नियोजित दौरा सोडून बाजारपेठेत दाखल झाले. बांधकाम साहित्याची दुकाने पुढील 8 दिवस सकाळी 9 ते 1 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्याच्या सूचना दिल्या.

Construction material shops open in Ratnagiri for 8 days kokanmarathi news

उदय सामंत यांच्या तत्परतेचे व्यापारी संघटना आणि आपद्ग्रस्तांनी कौतुक केले. जिल्ह्यात रविवारपासून तौत्के चक्रीवादळामुळे पावसाने झोडपून काढले. शहरी आणि ग्रामीण भागात देखील अनेक झाडे, फांद्या पडून घरांचे नुकसान झाले. त्यामुळे घर दुरुस्तीसाठी आवश्यक सामान नागरिकांना मिळावे या हेतूने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी फक्त बांधकाम साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र वादळ परिस्थितीतील नुकसानीचे पंचनामे इत्यादी कामे चालू असल्याने त्यांनी तातडीने जनतेला कळावे, यासाठी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर तसा मेसेज ठेवला.

मात्र आज सकाळी लेखी आदेश नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास व्यापार्‍यांना मज्जाव केला. ही घटना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी आपला नियोजित दौरा सोडून व्यापार्‍यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रत्नागिरी बाजारपेठेत धाव घेतली. वादळ परिस्थितीमुळे जनतेला घर दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी साहित्य मिळणे आवश्यक आहे. म्हणून बांधकाम साहित्याची दुकाने पुढील आठ दिवस सकाळी 9 ते 1 चालू ठेवण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचना सामंत यांनी प्रशासनाला दिल्या. नागरिकांच्या आणि व्यापार्‍यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कॅबिनेट मंत्री नियोजित दौरा सोडून बाजारपेठेत आल्याने व्यापारी संघटना आणि आपद्ग्रस्तांनी सामंत यांना धन्यवाद दिले.

Construction material shops open in Ratnagiri for 8 days kokanmarathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT