chetak 
कोकण

चेतक कन्ट्रक्शन ने नियम डावलले असल्यास गुन्हे दाखल करण्याची मागणी...

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चिपळूणमध्ये चौपदरीकरण करणार्‍या ठेकेदार कंपनीने नियम डावलून काम केले असल्यास कंत्राटदार व संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे. डॉ. नातू यांनी मुख्य अभियंता यांना पत्र लिहले आहे. त्यात असे म्हटले आहे की मुंबई - गोवा महामार्गाचे चिपळूण तालुक्यातील काम प्रगतीपथावर नाही. परशुराम ते आरवली या चिपळूण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्‍या चेतक कन्ट्रक्शन या कंपनीने पोटकंत्राटदार नियुक्त केले व त्यांच्या आर्थिक व्यवहार थकविले. अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत.

कंत्राटदार व नियमबाहय नेमण्यात आलेले पोटकंत्राटदार यांच्यामधील आर्थिक वादातून काम बंद करणे व काम बंद पाडणे अशा दोन्ही मागाने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये दिरंगाई निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराला पोटकंत्राटदार अधिकृत नियुक्त करता येतात का ? याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी खुलासा करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम निविदेमधील अटी व शर्तीनुसार होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निविदेमधील चिपळूण तालुक्यामधील कामाच्या दिरंगाई बाबत व निविदा प्रक्रियेनुसार अटी व शर्तीच्या विरोधात काम करणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आवश्यक तर त्यांचेविरूध्द गुन्हेही दाखल करावेत. परशुराम ते आरवली या राष्ट्रीय महामार्गाचे काम योग्य पध्दतीने निविदेमधील अटी व शर्तीनसार विहित कालावधीत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय होऊन कार्यवाही व्हावी. अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT