Dapoli Police Station  esakal
कोकण

Dapoli Police : 'त्या' वादग्रस्त पोस्टमुळे दापोलीत मोठा तणाव; ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात, काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर भावना दुखावतील अशी पोस्ट टाकल्यामुळे दापोलीत तणाव निर्माण झाला.

सकाळ डिजिटल टीम

पोलिस उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर व पोलिस अधिकारी विवेक अहिरे यांनी सामंजस्यांची भूमिका घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

हर्णै : सोशल मीडियावर भावना दुखावतील अशी पोस्ट टाकल्यामुळे दापोलीत तणाव निर्माण झाला. शहरातील शिवपुतळ्यासमोर (Chhatrapati Shivaji Maharaj) एकत्रित आलेल्या जमावाने आणि पोस्ट टाकणाऱ्याला तत्काळ अटक करा, अशी मागणी करत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे दापोलीतून दाभोळ, बुरोंडी, हर्णै, केळशीकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली.

पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला दापोली पोलिस (Dapoli Police) ठाण्यातील प्रांगणात नेले. तेथे पोस्ट टाकणाऱ्याने जमावासमोर माफी मागितल्यानंतर दोन तासांनी जमाव पांगला. याप्रकरणी दापोली पोलिसांत संबधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. निर्माण झालेल्या तणावामुळे दापोलीत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पोलिस उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर व पोलिस अधिकारी विवेक अहिरे यांनी सामंजस्यांची भूमिका घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. शहरातील काही समाजकंटकांनी भावना दुखावतील अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या. हे समजल्यानंतर मंगळवारी (ता. २३) दुपारी अचानक केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर जमाव गोळा झाला.

पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी जमावासमोर येऊन गुन्हा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. मात्र, जमावाने संशयितांनी जमावासमोर येऊन माफी मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना दापोली पोलिस ठाण्यात येण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर दापोलीत आले. त्यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. संशयित स्वतःहून माफी मागितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT