Corona impact cashew production konkan sindhudurg 
कोकण

गंभीर बाब...काजू उत्पादकांवर मोठ संकट

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे जारी झालेल्या संचारबंदीने सिंधुदुर्गातील रोज शेकडो टन काजू बोंडू वाया जात आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासन याच्या वाहतुकीला परवानगी देण्यास अनुकूल असले तरी प्रक्रिया उद्योग गोव्याच्या हद्दीत असल्याने केंद्राने यातून मार्ग काढण्याची गरज आहे. 

सध्या जिल्ह्यात काजूचा हंगाम ऐनभरात आहे. शेतकऱ्यांना काजू बीबरोबरच बोंडू विक्रीतूनही पैसे मिळतात. यंदा काजू बीचा दर अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशात काजू बोंडूला दर मिळाला तर शेतकरी थोडाफार सावरेल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात सर्वाधिक काजू लागवड असलेल्या सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्‍यातून बोंडू प्रक्रियेसाठी गोव्यात नेला जातो. गोव्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात बोंडूपासून फेणी बनवण्याचे उद्योग आहेत; मात्र ऐन हंगामात संचारबंदीमुळे दोन्ही राज्यांच्या सीमा सील झाल्या आहेत.

यामुळे जिल्ह्यात रोज शेकडो टन विक्रीयोग्य बोंडू कुजून जात आहे. यामुळे बागायतदार हवालदिल आहेत. या प्रश्‍नांबाबत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी आज आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले. यावेळी आंबा, द्राक्षासह इतर फळांना वाहतूक परवाना मिळाल्याचा मुद्दा मांडण्यात आला; मात्र ही थेट खाण्यायोग्य फळे असून, बोंडू प्रक्रियेसाठी नेला जात असल्याचा तांत्रिक मुद्दा आला तरीही आमदार नाईक यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला.

प्रशासनाने बोंडूच्या वाहतुकीला परवानगी देण्याची तयारी दाखवली; मात्र यासाठी महाराष्ट्र पासिंगचे वाहन आवश्‍यक आहे. शिवाय हा बोंडू गोव्याच्या हद्दीत जाणार असल्याने यात केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गोव्यातील प्रक्रिया उद्योजक हा बोंडू घ्यायला तयार आहेत; मात्र परवानगीच्या तांत्रिक मुद्द्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात बोंडू कुजून जात आहे. यात शेतकऱ्यांची हानी होत आहे. 

आंबा वाहतुकीसाठी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न केले. त्यातून आंब्याच्या वाहतुकीचा प्रश्‍न बऱ्यापैकी मार्गी लागला. काजूचा हंगाम अल्पकाळाचा असतो. यामुळे वाहतुकीबाबत लवकर निर्णय गरजेचा आहे. श्री. प्रभू यांनी काजू बोंडूच्या वाहतुकीबाबतही केंद्र स्तरावरून संबंधित विभागांमार्फत तोडगा काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- गणेशप्रसाद गवस, जिल्हा उपप्रमुख शिवसेना. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT