corona infected person run away from quarantine place in dabhol 
कोकण

अन् कोरोना बाधित व्यक्तीने 'मी लघुशंकेला जाऊन येतो' असं सांगत ठोकली धूम...

सकाळवृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) - दापोली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून काल (ता.13) रोजी त्यात 4 जणांची भर पडली आहे. बोरिवली गावातील शाळेत क्वारंटाईन करून ठेवलेल्यांपैकी एक जण कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट आल्यावर त्याला आणण्यास आरोग्य विभागाची गाडी गेली होती.ही गाडी आल्यावर या कोरोना बाधित व्यक्तीने 'मी लघुशंकेला जाऊन येतो' असे सांगत शाळेतून धूम ठोकली. ही घटना काल रात्री घडली आहे.

बाधित रुग्णच पळून गेल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले

दापोली तालुक्यात काल सायंकाळी उशिरा चार जण कोरोनाबधित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्यावर, होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या संशयितांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी गाडी घेऊन गेले होते.साकुर्डे व सडवे येथील 2 कोरोना बाधित रुग्णांना गावातून आणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर तिसरा रुग्ण उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातच होता. बोरिवली गावातील मराठी शाळेत क्वारंटाइन करून ठेवलेल्या चौथ्या रुग्णास आणण्यासाठी कर्मचारी गेले असता हा प्रकार घडला. कोरोना बाधित रुग्णच पळून गेल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असून या रुग्णाचा काल रात्रीपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT