Corona positive patient found in ratnagiri district
Corona positive patient found in ratnagiri district 
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 20 कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या पोहचली 195 वर...

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु असून  रुग्ण संख्या 200 पार होण्याची चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.  दरम्यान बुधवारी सायंकाळी पुन्हा 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 195 वर पोहोचली आहे.आज आलेल्या 57 अहवलापैकी 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 45 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालांपैकी  रत्नागिरी- 6, कळंबणी- 3, राजापूर- ३ असे एकूण १२ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.

दरम्यान आज निगेटिव्ह आलेल्या आहवालांपैकी कळंबणी-15, राजापूर- 9, कामथे- 3, रत्नागिरी- 18 असे एकूण 45 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
रत्नागिरी तालुक्यात सापडलेले 6 पॉझिटिव्ह रुग्णत  क्रांतीनगर, मजगाव रोड येथील (स्त्री वय 45) मुंबई ठाणे येथून प्रवास केला होता.  साखरपा मुरलीधर आळी (स्त्री वय- 44) मुंबई  प्रवास. भांडारपुळे रत्नागिरी येथील (पुरुष वय- 62) मुंबई येथून प्रवास इतिहास. 4) उक्षी वरचीवाडी संगमेश्वर (पुरुष वय- 57) मुंबई येथून प्रवास इतिहास. 5) आगवे ता. जि. रत्नागिरी (पुरुष वय- 27) मुंबई येथून प्रवास इतिहास. ६) साखरपा देवळे संगमेश्वर  (पुरुष वय- 25) मुंबई येथून प्रवास इतिहास. हे सर्व 6 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल झालेले आहेत.

राजापूर येथील प्रिंदावन गावातील (पुरुष वय- 39) रुग्ण कुंभवडे रुग्णालयात दाखल आहे. 2) कोटापूर गावातील (पुरुष वय- ५५) रुग्ण सोलगाव रुग्णालयात दाखल आहे. 3) कोंडिवले येथील (पुरुष वय- ८) रुग्ण ओणी रुग्णालयात दाखल आहे. खेड कळंबणी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही.  
दरम्यान मंगळवारी रात्री उशीरा आणखी 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले. या आठही जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये, रत्नागिरीतील 6 आणि संगमेश्वर येथील 2 जणांचा समावेश आहे. तर, रत्नागिरीत सापडलेल्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराखाली दाखल करण्यात आले आहेत.


रत्नागिरी मधील रुग्णांची माहिती

1) पुरुष वय 48 - पुनस कुंभारवाडी - चेंबूर मुंबईतून  21 मे 2020 ला  गावी परतला. 24 मे ला स्वॅब - पॉझिटिव्ह - डीएच रत्नागिरीत दाखल.

2) स्त्री वय 14 - राजापूर - कांदिवली मुंबईतून राजापूरला आली. तिचे आई,वडील आणि भाऊ हे देखील पॉझिटिव्ह - डीएच रत्नागिरीत दाखल.

3) पुरुष वय 48 -  नाणीज घडशीवाडी - मालाड मुंबईतूतन 23 मे 202 ला परत. ताप आणि अंगदुखी- जिल्हा रुग्णालयात दाखल.

4) स्त्री वय 40 - रुग्ण क्रमांक 3 ची पत्नी. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल. 

5) पुरुष वय 48 - रा. दख्खन, संगमेश्वर - मुलुंड मुंबईतून 19 मेला परत. जिल्हा रुग्णालय रत्नागिरीत दाखल.

6) पुरुष वय 18- रा. शांतीनगर,रत्नागिरी, सध्या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये होता. आता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करणार आहेत.


संगमेश्वर तालुक्यातील रुग्ण - 1) पुरुष वय  25 - मानकोंड फेपडेवाडी, संगमेश्वर- मुंबई विरार येथून प्रवास, 2) स्त्री वय 28 - रुग्ण क्रमांक 1 ची पत्नी.


दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 195 झाली आहे. त्यापैकी 76 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 114 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT