corona positive women found in dapoli 
कोकण

'त्या' महिलेच्या भोवतीच होते सर्व जण अन् तिच निघाली कोरोना पॉझिटिव्ह...

सकाळवृत्तसेवा

दाभोळ - दापोली तालुक्यातील पहिल्याच कोरोनाबाधित महिलेसंदर्भात एक वेगळीच माहिती पुढे आला आहे. कोरोनाच्या प्रदूर्भावाच्या काळात देखील रुग्णालय प्रशासनाकडूनही कसे काम केले जाते याचा नमुना या उदाहरणामुळे पुढे आलं आहे. मुंबई येथून पोटाची शस्त्रक्रिया केल्यानंतर काही काळाने ही महिला, तिचा मुलगा व सून हे रुग्णवाहिका करून मुंबई येथून 30 एप्रिल रोजी रात्री दापोलीत आले.

दापोली येथे आल्यावर या तिघांची तपासणी करून त्यांना आयसोलेशन कक्षात न ठेवता पेड वॉर्डात ठेवण्यात आले होते.त्यानंतर या 65 वर्षीय महिलेवर उपचारही सुरू होते. तोपर्यंत या महिलेवर सर्वसाधारण रुग्ण म्हणून पाहिले जात होते, त्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर व नर्सेस व इतर कर्मचारी हे पीपीई किट परिधान न करताच जात होते, मात्र एक दिवस या महिले संदर्भात शंका आल्याने तिचा स्वँब घेण्यात आला व तो तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला. जेव्हा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हा या महिलेवर उपचार करणाऱ्या सर्वांमध्ये भीतीचे वातावरण असून या सर्वांचे आता स्वँबचे नमुने घेण्यात आले आहेत.

कोविड 19 संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविडचा संसर्ग असलेल्या भागातून रुग्ण आल्यास त्याची तपासणी करून त्याचे अलगिकरण करावयाचे असून दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने आता त्याचा नाहक त्रास डॉक्टर व इतर  कर्मचार्यांना आता सहन करावा लागत आहे.
ही महिला पेड वॉर्ड मध्ये असताना तिला तिचे नातेवाईक व   ग्रामस्थही भेटून गेल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली असून आता या  सर्वांचे विलगिकरण करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT