corona Report of eighty five patients in Ratnagiri district are negative 
कोकण

दिलासादायक : रत्नागिरी जिल्ह्यातील 85 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह....

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने दडपणाखाली गेलेल्या नागरिकांना आज (ता.3) सकाळीच दिलासा देणारी बातमी आहे. जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 85 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाचे पाच रुग्ण बरे झाल्यानंतर जिल्हावासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु याच दरम्यान संगमेश्वर आणि चिपळूण येथे प्रत्येकी एक एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली. हे दोन्ही रुग्ण मुंबईतून प्रवास करून गावी आल्याने चाकरमान्यांना गावी आणण्याचा मुद्दा वादात सापडला आहे.  दरम्यान रविवारी सकाळीच रत्नागिरीकरांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. कोरोना संशयितांचे तब्बल 85 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कामथे उपजिल्हा रुग्णालय येथील 32, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय 6, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी 8, दापोली प्राथमिक आरोग्य केंद्र 9, गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्र 10 आणि मंडणगड प्राथमिक आरोग्य केंद्र येथील 20 अहवालांचा समावेश आहे.                        

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT