corona test mining worker issue konkan sindhudurg 
कोकण

खाण कामगारांची कोरोना तपासणी करण्याची मागणी

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - परराज्यातून येणाऱ्या खाण कामगारांमुळे सिंधुदुर्गात कोरोना संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे याकडे महसूल विभागाचे लक्ष वेधण्यात यावे, जिल्ह्यात येण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी करावी, अशी मागणी येथे पंचायत समिती सदस्यांकडून आरोग्य विभागाकडे करण्यात आली. याबाबत योग्य उपाययोजना राबविल्या जातील, तालुक्‍यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून आतापर्यंत अडीच हजार लोकांना लस देण्यात आली आहे. यात 60 वर्षावरील नागरीकांचा व 45 वर्षावरील दुर्गम आजारग्रस्तांचा सहभाग आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली. 

येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी प्रभारी सभापती शितल राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी सभापती पंकज पेडणेकर, रवींद्र मडगावकर, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, संदीप नेमळेकर, प्राजक्ता केळुसकर, मनीषा गोवेकर, गौरी पावसकर, सुनंदा राऊळ, रेश्‍मा नाईक, ऋतिका बागकर, निकिता सावंत आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मायनिंग व खाण व्यवसायात काम करण्यासाठी परराज्यातून कामगार येत आहेत. त्यांची कोरोना तपासणी केली जात नसल्याचे समोर येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची चाचणी होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यामुळे जिल्हावासीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागेल. त्यासाठी ही जबाबदारी महसूल विभागाने घ्यावी, याबाबत आरोग्य विभागानेही योग्य दखल घेऊन त्यांना तशा सूचना द्याव्यात, असे उपस्थित सदस्यांकडून सांगण्यात आले. 

एकाच शेतकऱ्याचे दोनदा नाव 
कृषी विभागाच्या यांत्रिकीकरणाच्या सोडतीत पंधराशेपैकी केवळ 25 प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लाभार्थींची यादी वाचताना एकाच शेतकऱ्याचे दोन वेळा नाव आल्याने हा विषय चर्चेचा बनला. पंधराशे पैकी केवळ 25 शेतकऱ्यांना लाभ दिला जातोय आणि त्यात एकाच शेतकऱ्याला दोन ठिकाणी लाभ मिळतो, मग अन्य शेतकऱ्यांचे काय? असा सवाल सावंत यांनी केला. 

...ही तर पिळवणूकच 
एकीकडे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे यांत्रिकीकरणासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध करून न देता त्यांची अशी पिळवणूक केली जात आहे. पंधराशे पैकी 25 शेतकऱ्यांना लाभ मिळणे, ही त्यांची शासनाने केलेली चेष्टा आहे, असा आरोपही श्री. सावंत यांनी यावेळी केला. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT