Corona under control in India due to lockdown 
कोकण

लॉकडाऊनमुळे भारतात कोरोना नियंत्रणात ; अमेरिकेसारखी स्थिती नाही..

गोविंद राठोड

खेड (रत्नागिरी) : अमेरिकेच्या तुलनेत भारताने घेतलेल्या लॉकडाऊन भूमिकेमुळे देशात कोरोना आटोक्यात येत आहे नाही तर अमेरिकेतील स्थिती आपल्या देशात निर्माण झाली असती आणि ती स्थिती हाताबाहेर गेली असती असे प्रतिपादन अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या खेडच्या अनुजा धारिया यांनी सकाळशी बोलताना केले. 

त्या म्हणाल्या. अमेरिकेत लॉकडाऊनमुळे सरकारने तसेच खासगी कंपन्यातील 44 लाख कामगारांच्या  नोकरंयावर गदा आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एव्हढ्या मोठ्या संख्येने कामगाराना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्या रोजच्या जेवणाचा फार मोठा प्रश्‍न सरकारपुढे होता. त्यावर उपाययोजना म्हणून सरकार अशा हातावर पोट असणार्‍या कामगारांना त्यांच्या बँकेतील बचत खात्यात थोडी थोडी रक्कम जमा करत आहे.त्यातून ते लोक गरजेच्या वस्तू खरेदी करतात.

राईज अगेन्स्ट हंगर उपक्रम

माणुसकी म्हणून आम्ही अशा नागरिकांना मदत देण्यात पुढाकार घेतो असे त्या म्हणाल्या. कोरोना विषाणू काय काय करायला लावणार आहे हे माहित नाही परंतु येथील गरीब लोकांना फूड पॅकेज तयार करून त्याचे वाटप केले जाते. येथील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आम्ही मदत देण्यात पुढाकार घेतो. राईज अगेन्स्ट हंगर हा उपक्रम आम्ही येथे राबवला असून त्यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. त्यातून मिळणार्‍या मदतीने गोर गरिबांना फूड पॅकेज तयार करून आठवड्यातून एकदा त्याचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 2 लाख पंच्याऐंशी हजार फूड पॅकेजचे वाटप करण्यात आले आहे. फूड पॅकेजमध्ये जेवण बनवण्यासाठी आवश्यक अन्न सामग्री आहे.

भारतात खूप चांगल्या प्रकारे उपाय योजना

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी भारतात खूप चांगल्या प्रकारे उपाय योजना राबवल्या जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी जोरदार समर्थन केले. संपुर्ण टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) कोरोना विषाणूवर आपण मात करू शकतो हे आपल्या देशाने जगाला दाखवून दिले असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. भारतातील आरोग्य सेवेला वाहून घेणारे सर्व डॉक्टर्स, परिचारिका, परिचारक, पोलिस सेवेत असणारे अधिकारी, शिपाई, स्वयंसेवकांनी आतापर्यंत दिलेले योगदान खूप मोठे आहे. हे सर्व निश्‍चित कौतुकास पात्र आहेत असे त्यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT