corona vaccine for 45 year all members vaccination in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत 45 वर्षावरील सर्वांचे एप्रिलपासून सरसकट लसीकरण

राजेश कळंबटे

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये सध्या सर्व शासकीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये लसीकरण सुरु असून कोवीशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस उपलब्ध आहेत. 60 वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यात 01 एप्रिल 2021 पासून 45 वर्षापासून सर्वांना सर्व शासकीय रुग्णालयात मोफत कोव्हीड लस जाणार आहे. ही लस सुरक्षित असून लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. लसीची मागणी वाढत आहे. कोव्हीड-19 लसीकरणानंतर कोव्हीड आजाराची तीव्रता कमी आढळली आहे. मृत्यूदर पण कमी झालेला दिसत आहे.

सध्या महाराष्ट्रात दुसरी कोव्हीडची लाट सुरु असून लसीकरणामुळे मृत्यूदर कमी झाल्याचे दिसून येत आहे. सर्व नागरिकांनी कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, नियमित हात धुणे, गर्दी टाळणे इत्यादीचे काटेकोरपणे पालन करावे स्वत:ची व कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोवीशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. लसीकरणाचा शंभर टक्के लाभ घेवून आरोग्‍य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

Satana Wedding Drama: बोहल्यावर नवरीचा ठाम नकार; वरात थेट सटाणा पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT