coronaviras crisis at tortoise festival kokan marathi news 
कोकण

Coronaviras : कोकणातील कासव महोत्सव रद्द ; कोरोनाचे सावट.. ...

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड /दापोली (रत्नागिरी) : वेळास, आंजर्ले येथील कासव महोत्सवावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. जगभरातून येणारे पर्यटक लक्षात घेत वेळास ग्रामसभेने हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आंजर्ले महोत्सवाबाबत एका बैठकीत स्थगितीचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात वेळास येथे आज ग्रामसभेचे आयोजनही करण्यात आले होते. त्यानंतर सरपंच प्रल्हाद तोडणकर यांनी आरोग्य सुरक्षेच्या कारणास्तव कासव महोत्सव रद्द केल्याचे पत्रकारांना सांगितले. समुद्रात पिल्ले सोडण्याची प्रक्रिया हंगाम संपेपर्यंत चालू राहणार आहे. यंदाचे कासव विणीच्या हंगामात वेळास किनारी १९ घरट्यांत २१३९ कासवाचे पिल्लांची अंडी तर एक घरटे नैसर्गिक पद्धतीने संरक्षित करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात अधिक पिल्ले बाहेर पडण्याची शक्‍यता आहे.

पर्यटक हंगामावर परीनाम  

घरटी संरक्षित करण्याचा काळ व विणीचा हंगाम याचे गणित मांडून आयोजक व वनविभागाने ३ मार्चपासून कासव महोत्सव सुरु होणार असल्याचे विविध माध्यमांतून जाहीर करण्यात आले. पहिल्या दोन दिवशी मोठया संख्येने पिल्ले बाहेर न पडल्याने पर्यटकांची निराशा झाली. मुंबई पुणे ही दोन शहरे आरोग्यांचे दृष्टीने सध्या हाय अर्लटवर आहेत. वेळास येथे येणारे पर्यटक हे पुणे मुंबईतून येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास पर्यटक हंगाम फूलण्याची शक्‍यता धूसर आहे.

हेही वाचा- मुंबईच्या या चिमुकलीचा शिमगोत्सव ठरला अखेरचाच.... ​
कोरोना व्हायरसची पार्श्‍वभूमी
आंजर्ले येथे १४ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेला कासव महोत्सवही स्थगित करण्यात आला आहे. आंजर्ले समुद्रकिनारी ७ घरट्यात ७६९ कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर कासव महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून कोणताही धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी वनविभाग, कांदळवन कक्ष व सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ यांच्याशी चर्चा करून हा कासव महोत्सव स्थगित केल्याची माहिती कासवमित्र तृषांत भाटकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही... ; खाजगी व्हिडिओवरून ब्लॅकमेल झाल्यामुळे मुंबईत CA ने संपवले जीवन

Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

Latest Maharashtra News Updates : : शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तीन कोटी

Polytechnic Admissions 2025: कोणते कॉलेज निवडू, कोणती शाखा निवडू ? पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता काउंटडाऊन सुरू

SCROLL FOR NEXT