coronaviras imapct story in kokan 
कोकण

रक्ताच्या नात्यांनी नाकारले : अनोळखी खांद्यांवरूनच झाला अखेरचा प्रवास

राजेश कळंबटे

रत्नागिरीः  कोरोना व्हायरसने माणसाला माणुसकी विसरायला लावल्याची अनेक उदाहरणे समोर आली. मृत्यूनंतरदेखील नातेवाईकांनी अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याने काहीजणांचे पार्थिव अंत्यसंस्कारा करिता ताटकळत राहिले. अशावेळी रक्ताच्या नात्यांपेक्षा कामाला आले ते अनोळखी खांदे. नातेवाईक असूनहि आज पालिका कर्मचारी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत आहेत. ज्यावेळी नातेवाईक स्मशानभुमितहि यायला तयार होत नाहीत अशावेळी स्वतः जोखीम घेऊन जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी 27 जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. 

कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. परंतु काही रुग्ण मात्र उपचाराला प्रतिसाद देत नाहीत आणि त्यांचा मृत्यू होतो. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी यायला नातेवाईक तयार होत नाहीत. आई-वडीलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुले घाबरत आहेत. परंतु पालिका, जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत आहेत. 

जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर हे कर्मचारी सज्ज होतात. 
तेरा जणांच्या दोन पथकांमार्फत अंत्यविधी केले जातात. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी स्वतःच्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई कीट परिधान करतात. रुग्णवाहिकेमधून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरुन मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. मृतदेहाचे दफन करण्यासाठी सात ते आठ फुट खोल, अडीच फुट रुंद अशा प्रकारे खड्डे काढून त्यामध्ये मृतदेहाचे दफन केले जाते. त्यानंतर पीपीई कीट तेथेच जाळले जातात. मार्चपासून जुलैपर्यंत २७ मृतदेहांचे दफन,दहन करण्यात आले आहे. 

अंत्यसंस्कार झाल्यानंतर घरी गेल्यानंतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातात. निर्जंतुकीकरण केल्यानंतरच कुटुंबात जात असल्याचे या कर्मचार्‍यानी सांगितले. आरोग्य निरीक्षक आरिफ शेख, संदेश कांबळे, किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम कांबळे, दिनेश जाधव, मनोहर कदम, संजय मकवाना, प्रभाकर कांबळे, ज्ञानेश कदम, योगेश मकवाना, योगेंद्र जाधव, विशाल राठोड, बबन बेटकर, संदिप सावंत हे दोन पथकांच्या माध्यमातून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जागतिक GDP मध्ये 40 टक्के वाटा ब्रिक्स देशांचा! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा G7 देशांवर निशाणा

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

SCROLL FOR NEXT