coronaviras impact The shepherds in rajapur kokan marathi news 
कोकण

कहा है कोरोना ? जंगल वा पहाड नही आयेगा कोरोना ” : गुरख्यांनी मांडली आपली व्यथा...

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनचा चांगलाच फटका रोजगारानिमित्ताने कोकणात येवून आंबा बागांमध्ये राखणीसाठी राहीलेल्या गुरख्यांना बसू लागला आहे. आंब्याच्या बागेमध्ये राहणार्‍या अनेक गुरख्यांकडील अन्नधान्याचे साहित्य संपल्याने त्यांऩा भुकेकंगाल राहण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीतही तग धरून राहीलेल्या या गुरख्यांकडून “ कहा है कोरोना ? जंगल वा पहाड नही आयेगा कोरोना ” असा आत्मविश्‍वासही व्यक्त करताना त्यांच्याकडून निडरपणाही दाखविला जात आहे.

कोकणामध्ये विकसित झालेल्या आंबा बागांमध्ये राखणीसाठी नेपाळ येथून दरवर्षी मोठ्याप्रमाणात गुरखे येतात. जंगली भागातील आंब्याच्या बागेमध्ये छोटी तात्पुरती झोपडी बांधून एकट्या-दुकट्याने हे गुरखे बिनधास्त राहून बागेची राखण करतात. त्यातच, आंबा बागेमध्ये खतांची मात्रा देणे, औषधांची फवारणी करणे, तयार आंबा काढणे इथपासून थेट मालाची प्रतवारी करून तो पेट्यांमध्ये भरण्यापर्यंतची विविध प्रकारची कामे लिलया ते करताना अनेक बागांमध्ये दिसतात.

हंगाम संपल्यानंतर ते पुन्हा गावाकडे मघारी फिरतात. ‘कमी दामामध्ये जादा काम’ करणार्‍या गुरख्यांची आंबा बागांमधील आंबा हंगामातील संख्या गेल्या काही वर्षामध्ये कमालीची वाढली आहे. गुरख्यांच्या वास्तव्याबाबत विविध प्रकारची चिंता व्यक्त केली जात असली तरी, आंबा बागांमधील गुरख्यांची संख्या मात्र, काही कमी झालेली दिसत नाही.

‘कमी दामामध्ये जादा काम’
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका या बागांमधील गुरख्यांना बसू लागला आहे. त्यांना कामासाठी ठेवणारे आंबा बागायतदार अन्य धान्याचा पुरवठा करतात. मात्र, लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे बागायतदारांकडून होणारा अन्यधान्याचा पुरवठा गेल्या काही दिवसांपासून थांबलेला आहे. त्यातच, उपलब्ध अन्नधान्याचा संपलेला साठा आणि हातामध्ये पैसा नसल्याने गावामध्ये इच्छा असूनही खरेदी करण्यामध्ये येणार्‍या अडचणींमुळे या गुरख्यांचा पुरता कोंडमारा झाला आहे. गेली सात वर्ष कोकणामध्ये बागांमध्ये राखणीचे काम करणार्‍या रामशेर नामक गुरख्याने सहज गप्पाटप्यांच्या ओघामध्ये मांडलेल्या समस्येने त्याच्यातील भयावहता लक्षात येते.

वो जंगल वा पहाडी इलाखे नही आयेगा.

‘ शेठ लोगही आते नही. तो खानेका बंदोबस्तही नही होता. मेरे पास खाने के लिये धान्य है. लेकीन वो कुछ दिनोंमे खतम हो जायेगा. धान्य खरेदनी के लिए मेरे पास पैसे नही है. तो मै कहा से खाने का पैगाम करू. मोबाईल की चर्चा मे कोरोना की बाते होती है. लेकीन वो जंगल वा पहाडी इलाखे नही आयेगा. ”

रामशेर, गुरखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT