coronaviras impact village people in sadvli kokan marathi news 
कोकण

मोफत धान्य द्यायला गेलो तर महिला म्हणते मोदींनी दिलेले पैसे कुठे आहेत ?

सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) :कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेकांनी अनेक घोषणा करुन ठेवल्याने ग्रामिण भागातील महिलांचा व नागरीकांचा गोंधळ उडालेला दिसुन येत आहे.देवरुख येथे हम ग्रुप व पञकार एका महिलेला मोफत डाळ तांदुळ व इतर जिन्नस घेवून द्यायला गेले तर या महिलेने फक्त डाळ तांदुळच आणलेत ? मोदींनी दिलेले पैसे का नाही आणलेत ? असा प्रश्न करुन मदत देणार्‍यांनाच निरुत्तर केले.

दुरदर्शन,सोशल मिडीया यावरुन विविध घोषणा,मदतीची आश्वासने दिली जात आहेत यामध्ये या नागरीकांचा गोंधळ उडत आहे,खरे काय खोटे काय हेही लाॅकडावुनमुळे लोकांना समजुन येत नाहीए.यामुळे शासनाने जाहीर केलेल्या रेशनिंगच्या घोषणा व मोदींनी सांगितलेले पर्याय त्या महिलेला पटवुन सांगण्यात आले व तीच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

ग्रामिण भागात संभ्रमाचे वातावरण 
रेशन धान्य दुकानावर पुरवठा विभागाने जाहीरकेल्याप्रमाणे धान्य मिळणार असुन विविध घोषणा व काही अफवा यामुळे अशा लोकांमध्य संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
मोफत धान्य घेताना नागरीकांनी विविध संस्था संघटनांकडुन पुन्हा धान्य घेवू नये कारण समाजात अनेक कुटुंबे यापासुन वंचित आहेत त्यांना ते देता येईल असे आवाहन हम ग्रुपला करावे लागले.मदत देताना ती गरजु लोकांपर्यंत कशी जाईल हेही सेवाभावी संस्थानी पाहीले पाहीजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT