coronavirus effect in sindhudurg district 
कोकण

मृतांची संख्या 25, एकूण बाधित 1 हजार 833! कोणता हा जिल्हा?

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज कोरोनाने आणखी एका व्यक्तीचे मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृतांची संख्या 25 झाली. आज आणखी 76 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनाबाधित एकूण संख्या 1 हजार 833 वर पोहोचली. आणखी 19 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 868 झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 940 झाली. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता.3) दुपारी 12 वाजेपर्यंत कोरोनाचे एकूण रुग्ण 1 हजार 757 होते. त्यानंतर आज दुपारपर्यंत 81 अहवाल प्राप्त झाले. यातील केवळ 5 अहवाल निगेटिव्ह आले, तर 76 अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे बाधित व्यक्तीची संख्या 1 हजार 833 झाली. नव्याने आढळलेल्या रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

जिल्हा कोरोना चाचणी केंद्राला नव्याने 73 कोरोना नमुने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 16 हजार 313 झाली आहे. यातील 16 हजार 24 नमुने अहवाल प्राप्त झाले आहेत, तर 289 अहवाल प्रतीक्षेत राहिले आहेत. नव्याने प्राप्त झालेल्या 81 अहवालात आणखी 5 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे निगेटिव्ह अहवालांची संख्या 14 हजार 191 झाली आहे, तर नव्याने 76 अहवाल बाधित आल्याने आतापर्यंत 1 हजार 833 अहवाल बाधित झाले आहेत. आणखी 19 व्यक्तींना डिस्चार्ज दिला. त्यामुळे आतापर्यंत 868 व्यक्ती ठणठणीत होऊन घरी परतले आहेत, तर आतापर्यंत 25 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 आणि वास्को (गोवा) येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. परिणामी 940 रुग्ण सक्रिय आहेत. या सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात तयार केलेल्या संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 78 व्यक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे क्‍वारंटाईन संख्या 13 हजार 704 झाली आहे. यातील गाव पातळीवरील संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 58 व्यक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे येथील दाखल व्यक्तीची संख्या 9 हजार 278 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 20 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 4 हजार 426 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने 596 व्यक्ती दाखल झाल्याने 2 मेपासून जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या 2 लाख 11 हजार 159 झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 229 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत, तर रेल्वेने जिल्ह्यात 4 हजार 137 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

SCROLL FOR NEXT