coronavirus impact konkan sindhudurg 
कोकण

सतर्कता..आणखी सहा नमुने तपासणीसाठी

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यातील सहा व्यक्तींचे नमूने नव्याने कोरोना विषाणुच्या अनुषंगाने तपासणीसाठी पाठविले आहेत. आयसोलेशनमध्ये नव्याने दोन रुग्णांची वाढ झाली असून सध्या 12 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी चालविण्यास मनाई करणारा आदेश आज सायंकाळी पारित केला आहे. 

जिल्ह्यात सोमवारपासून (ता.30) परराज्यातील मजूर, कामगार आणि बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले आहेत. याठिकाणी 446 व्यक्ती रहात असून त्यांच्यासाठी निवाऱ्यासोबतच जेवण, खाणे, पिण्याचे पाणी यासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी तालुकास्तरावर कॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली होती. 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. आज या रुग्णांमध्ये दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 12 झाली आहे.

यापूर्वी 34 व्यक्तींचे नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमूने अहवाल प्राप्त झाले होते. यात एक पॉझिटिव्ह तर उर्वरित 33 नमूने निगेटिव्ह आले होते. त्यामुळे नमूने अहवाल यायचा शिल्लक नव्हता; पण सोमवारी (ता.30) उशिरा दोन व आज चार असे एकूण सहा नमूने अहवाल कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या सहा अहवालांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 134 व्यक्ती होम क्‍वारंटाइन आहेत. 56 व्यक्ती शासकीय आरोग्य संस्थेत क्‍वारंटाइन आहेत. आज दिवसभरात 2 हजार 638 व्यक्तींची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी केली; मात्र यातील एकाही व्यक्तीला कोरोना लक्षणे आढळली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या तब्बेतीत चांगली सुधारणा होत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नागरी भागात गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. आज काही भागात एसआरपीचे जवान पाचारण करण्यात आले. याचा पुढचा टप्पा म्हणून उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी बंदीचा आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी जारी केला. 

तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात असलेले मजूर, बेघर यांना भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी मजूर, बेघर यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मजूर, बेघर यांच्यासाठी यापूर्वीच 10 ठिकाणी कॅम्प उभारून मोफत निवास व्यवस्था केली आहे. 

माहिती भरण्यासाठी ऑनलाईन सोय 
कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिकडे पोहोचण्यास यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या नागरिकाला कोरोना लक्षणे आहेत हे एकाचवेळी समजू शकत नाही. परिणामी अशा व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने खास लिंक तयार केली आहे. या लिंकमार्फत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची माहिती भरायची आहे. यामुळे प्रशासनाला कोणत्या व्यक्तीला कोणती लक्षणे आहेत, हे सहज समजू शकते. Http://dio sindhudurg.in अशी ही लिंक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT