coronavirus impact konkan sindhudurg
coronavirus impact konkan sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात आता अवघे 12 सक्रिय 

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) - प्रलंबित असलेल्या 48 अहवालांपैकी प्राप्त झालेल्या 21 अहवालांत एकही कोरोना बाधित न मिळाल्याने आज दिवसभरात रुग्ण संख्या 160 एवढीच राहिली होती. उपचाराखाली असलेल्या 25 पैकी आणखी 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आता 12 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. परिणामी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 143 झाली आहे. 20 तारखे पासून जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. 

नव्याने 30 व्यक्तींचे आज कोरोना नमूने घेण्यात आले आहेत. त्यामुळे नमुन्यांची संख्या 3 हजार 232 वर पोहोचली आहे. नव्याने 21 नमुने अहवाल प्राप्त झाल्याने प्राप्त अहवालांची संख्या 3 हजार 154 झाली आहे. यातील 160 पॉझिटिव्ह तर 3 हजार 15 निगेटिव्ह आले आहेत. सध्या 57 अहवाल प्रलंबित आहेत. यातील चार व्यक्तींचे निधन झाले. एक व्यक्ती मुंबई येथे गेली. तर 143 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने केवळ 12 रुग्ण उपचाराखाली दाखल आहेत. 

दाखल असलेल्या बाधित व संशयित रुग्णातील जिल्हा रुग्णालयात 4 बाधित तर 17 संशयित उपचार घेत आहेत. कोविड हेल्थ हॉस्पिटलमध्ये 8 बाधित उपचार घेत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये एकही व्यक्ती दाखल नाही. त्यामुळे आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या सध्या 29 आहे. आज 2 हजार 329 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. 468 व्यक्ती घरी परतल्याने संस्थात्मक क्वारंटाइनची संख्या 20 हजार 216 एवढी राहिली आहे.

493 व्यक्ती घरी गेल्याने गाव पातळीवरील क्वारंटाईन संख्या 18 हजार 68 झाली आहे. नागरी क्षेत्रात; मात्र 16 संख्या वाढल्याने येथील क्वारंटाइन व्यक्ती 2 हजार 71 झाली आहे. 1262 व्यक्ती जिल्ह्यात नव्याने दाखल झाले आहेत. त्यामुळे 2 मेपासून 1 लाख 6 हजार 158 व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. 

हरकूळ कसालकरवाडीत कंटेन्मेंट झोन 
कणकवली तालुक्‍यातील हरकुळ बुद्रुक कसालकरवाडी येथील एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज स्टाफ क्वार्टर व 50 मीटरचा परीसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये 2 जुलैपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्‍यक सेवा, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्‍यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बॅंक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT