coronavirus impact kudal taluka konkan sindhudurg 
कोकण

सांगलीतून कुडाळला आला पोलिस कर्मचारी आणि...

अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) - शहरातील श्रीरामवाडी येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. या रूग्णाच्या संपर्कात किती जण आलीत हे अद्याप उघड झालेले नाही. हा रूग्ण काही दिवसांपूर्वी सांगली येथून आला होता. या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तो पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्याचा संपर्क पोलिस ठाण्याशी आला होता का? याबाबतही चौकशी सुरू आहे. शहरवासीयांनी घाबरू नये, असे आवाहन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केले. 

कुडाळात अद्याप एकही कोरोनाग्रस्त आढळला नव्हता; मात्र आज पहिला रूग्ण आढळला. हा रुग्ण पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. येथील पोलिस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे ते आपल्या मूळ गावी म्हणजे सांगली येथे काही दिवसांपूर्वी गेले होते. वडिलांचे सर्व विधी अटोपून ते पुन्हा कुडाळ येथील श्रीरामवाडी येथे राहत असलेल्या चाळीत दाखल झाले. ते होम क्वारंटाईन होते. त्यांना ताप येत असल्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ओरोस रुग्णालयात दाखल केले. लक्ष्मीमंदिर ते श्रीरामवाडी मध्ये प्रवेश करणारा महामार्गावरील रस्ता सील करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. हा रुग्ण आढळल्यानंतर येथील नगराध्यक्ष ओंकार तेली, मुख्याधिकारी नितीन गाढवे, नगरसेवक राकेश कांदे, उषा आठल्ये, सचिन काळप यांनी नागरिकांना सतर्क करून हा कंटेन्मेंट झोन होईल असे सांगितले आहे. 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT