coronavirus impact mangaon school sindhudurg district 
कोकण

कोरोना रिपोर्ट आधीच शाळा सुरू केल्याने खळबळ

श्वेता पालकर

माणगाव (सिंधुदुर्ग) - परिसरातील त्या हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापनाच्या बेजाबदारपणामुळे मुलांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचा आरोप करत मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक व संस्था प्रशासनावर कडक कारवाई करावी, संपूर्ण शाळा तत्काळ सील करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी केली. आज संस्था व मुख्याध्यापकांना जाब विचारत संबंधित पालकांच्या शिष्टमंडळाने चांगलेच धारेवर धरले. 

जिल्हासह संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करूनच व कर्मचारी वर्गाचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट आल्यावरच शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते; मात्र संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट यायच्या आधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिक्षकांनीही शाळा सुरू करण्याच्या आधी झालेल्या पालकांच्या बैठकीत सर्वांचे अहवाल येवू द्या, नंतरच शाळा सुरू करा, अशी मागणी केली होती; पण ही मागणी मुख्याध्यापकांनी धुडकावून लावली होती.

ही बाब आता समोर आली आहे; पण या सर्वांना बगल देत 23 पासून शाळा सुरू केली. यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या एका शिक्षकाचा रिपोर्ट गुरूवारी (ता.26) पॉझिटिव्ह आला. हा शिक्षक सोमवार ते गुरूवार असे चार दिवस शाळेत होता. त्यांनी अध्यापन केले होते; मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षक व पालकांपासून लपवून ठेवली. शुक्रवारी अचानक संध्याकाळी उशिरा विद्यार्थी वर्गाच्या व्हॉटसऍप ग्रुपवर सुटी घोषित केली. यात शनिवारी, रविवारी, सोमवारी गुरूनानक जयंतीची व मंगळवारी माणगाव जत्रोत्सवाची सुटी जाहीर केली; पण शनिवारी कोणती सुटी हे घोषित केले नाही. यानंतर पालकांना तो शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची कुणकुण कालच सायंकाळी लागली. आज नेमकी कोणती सुटी दिली व तो शिक्षक पॉझिटिव्ह आढळूनही गप्प का? याचा जाब शिष्टमंडळाने विचारला. 

शिष्टमंडळाच्या मागण्या 
-संबंधित हायस्कूलच्या हलगर्जीपणामुळे धोका 
- बेजाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्‍यात 
- संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने चिंता 
- पालकांकडूनीही केला संताप व्यक्त 
- संपर्कातील शिक्षक, मुलांचे स्वॅब घ्यावेत 
- संबंधिताच्या कुटुंबाचीही चाचणी घ्या 

...तर जाब विचारणार 
अन्यथा पालक व विद्यार्थी यांना एकत्र घेवून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा धुरी यांनी दिला. शाळा सील केल्यानंतर शिक्षकांना जबरदस्तीने शाळेत बोलावण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी शिवराम केसरकर, माजी सरपंच बच्चाराम नाईक, भानू जुवेकर, ज्ञानेश्‍वर काणेकर आदी पालक उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

Uttar Pradesh: UP ATS चा धडाका! देवबंदमध्ये मोठी कारवाई; संशयास्पद व्हिडिओ आणि इराण-पाकिस्तान कनेक्शनची चर्चा

Premium|Artificial Intelligence Investment : एआय गुंतवणुकीतून आयटी क्षेत्राला धक्का; भारतीय कंपन्यांसमोर आव्हान

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

SCROLL FOR NEXT