coronavirus impact in sindhudurg district 
कोकण

अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली तरीही क्वारंटाईन, कुणासाठी हा नियम?

प्रभाकर धुरी

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - कोरोना संदर्भातील अँटीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरीही सिंधुदुर्गातील आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासन त्यांना दहा दिवस क्वारंटाईन करत असल्याने गोव्यातून गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येवू पाहणारे युवक-युवती अडचणीत आले आहेत. प्रशासन तीन दिवस क्वारंटाईन करण्यासाठी एनटीपीसीआर चाचणीचाच अहवाल मागत असल्याने यावर्षी त्यांच्यासाठी ती विघ्नाचीच वार्ता आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

गणेशोत्सवासाठी पुणे, मुंबई, गोवा व अन्य ठिकाणाहून 12 तारखेनंतर येणाऱ्यांसाठी प्रवासाआधी 48 तास कोविड 19चा अहवाल निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे; मात्र कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसत नसल्यास गोव्यातील सरकारी व खासगी प्रयोगशाळेत एनटी पीसीआर चाचणी केली जात नाही. त्याऐवजी अँटीजेन चाचणी केली जाते.

त्या चाचणीचा अहवाल ताबडतोब मिळतो आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळते. त्यात जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली तरच एनटीपीसीआर चाचणी केली जाते, जी विश्‍वासार्ह मानली जाते. असे असले तरी गोव्यातील लक्षणे नसलेल्या तरुण तरुणींची एनटीपीसीआर चाचणीस गोव्यातील प्रयोगशाळा तयार नाहीत. अँटीजेन चाचणी गोव्यात ग्राह्य धरत असले तरी ती सिंधुदुर्गात ग्राह्य धरली जात नसल्याने गोव्यातून जिल्ह्यात येणारे विचित्र कोंडीत अडकले आहेत.

घोटगेवाडी परिसरातील युवकांना त्याचा फटका गुरुवारी बसला. त्यांनी केलेली अँटीजेन चाचणी ग्राह्य न धरता त्यांना तीन दिवसांऐवजी दहा दिवस क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे गणपतीचा पहिला दिवस त्यांना मिळणार नाही. शिवाय आता यापुढे जे येतील त्यांच्याकडे एनटीपीसीआर चाचणीचा अहवाल नसेल तर त्यांनाही गणेशोत्सव साजरा करण्यात अडचणी येणार आहेत. 

अँटीजेन चाचणी ग्राह्य धरावी 
पोटापाण्यासाठी गोव्यात गेलेल्या युवक युवतींना गावी आल्यावर दहा किंवा चौदा दिवस आणि पुन्हा गोव्यात गेल्यावर चौदा दिवस क्वारंटाईन राहणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. अशी सुटी त्यांना मिळणार नाही, कदाचित त्यांना त्यांच्या नोकरीवर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे एकतर अँटीजेन चाचणीचे अहवाल सिंधुदुर्ग प्रशासनाने मान्य करुन तीन दिवसांचाच कालावधी क्वारंटाईनसाठी ठेवावा, अशी मागणी युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस आणि घोटगेवाडी शाखाप्रमुख सागर कर्पे यांनी केली आहे. 

शासन निर्णयानुसार तीन दिवस क्वारंटाईन राहण्यासाठी एनटीपीसीआर चाचणीचाच अहवाल लागतो. अँटीजेन चाचणीचा अहवाल आणल्यास संबंधितांना दहा दिवसच क्वारंटाईन राहावे लागणार आहे. 
- रमेश कर्तसकर, तालुका आरोग्य अधिकारी, दोडामार्ग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हातात पुजेची टोपली अन् मदतीसाठी महिलांच्या किंचाळ्या...वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील चेंगराचेंगरीचा थरारक VIDEO समोर

School Students Assault: भयंकर! इंग्लिश मीडियम स्कूलमधील २२ विद्यार्थ्यांवर अत्याचार, मुख्याध्यापकासह तिघांना अटक

MNS-MVA Morcha: लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली, शरद पवारांचे आवाहन

Mutual Fund : गेल्या 5 वर्षांत 20% पेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप लार्ज-कॅप म्युच्युअल फंड; पहा किती रिटर्न दिला!

Mumbai Morcha: मतदारयादी घोटाळा की मोठा राजकीय कट? ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाने बनावट अर्ज दाखल, Uddhav Thackeray म्हणाले...

SCROLL FOR NEXT