coronavirus impact vengurla taluka konkan sindhudurg 
कोकण

ट्रकचालकामुळे एकच खळबळ, वेंगुर्लेचे प्रकरण आहे तरी काय?

दिपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - शहरातील भटवाडी येथील शासकीय गोदामातील ट्रकचालकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतच्या माहितीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्‍विनी माईणकर यांनी दुजोरा दिला. 

ही व्यक्‍ती मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी असून सध्या भटवाडी येथील काजू व्यावसायिक यांच्या इमारतीमागील भागात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे तपासणीसाठी गेलेली होती. तेथून त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे पुढील तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या परिसराचा सर्व्हे करून याठिकाणी राहणाऱ्या दोन कुटुंबातील सर्वांचे स्वॅब नमुने घेतले आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या सर्व व्यक्‍तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. हा संपूर्ण परिसर पालिकेमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. 

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, डॉ. वजराटकर, पालिका नोडल अधिकारी सचिन काकड यांनी जागेची पाहणी केली. ती व्यक्ती राहत असलेला संपूर्ण परिसर दगडी कंपाऊंडने बंदिस्त असल्याने परिसर कटेंनमेंट झोन म्हणून घोषित केला असून या परिसराव्यतिरिक्‍त शहरातील इतर ठिकाणचे सर्व व्यवहार नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सुरू राहतील. सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार घेत असून लोकांनी घाबरु नये; परंतु नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले आहे. 

मत्स्यविक्रेत्यांना आवाहन 
कोरोना पोझिटिव्ह रूग्णाचा विचार करता कोरोनाचा प्रसार इतरत्र होवू नये, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने दाभोली नाका येथे तात्पुरत्या स्वरुपात बसविलेले मत्स्यविक्रेत्यांना उद्यापासून (ता.18) गणेश चतुर्थीचा कालावधी संपेपर्यंत मांडवी रोड येथे बसविण्याचे नियोजन केले आहे. दाभोली नाका येथे सध्या ग्राहक व मच्छी विक्रेत्यांची गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टसिंगचे पालन योग्यरितीने पाळले जात नाही, असे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. उद्यापासून सर्व मच्छी विक्रेत्यांनी मांडवी रोड येथे बसून मच्छी विक्री करावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले. 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT