coronavirus test teachers issue kankavli sindhudurg
coronavirus test teachers issue kankavli sindhudurg 
कोकण

शिक्षकांच्या कोरोना टेस्टमध्ये कणकवली मागे 

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - राज्यभरात 27 पासून प्राथमिक शाळा सुरू झाल्या असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाकडून दैनंदिन अहवाल मागविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी जवळपास 52 टक्के विद्यार्थी शाळेत हजर राहिल्याची नोंद झाली आहे, तर सुरक्षेचा भाग म्हणून सर्व कोरोनाविषयक नियमांचे पालन शिक्षकांकडून होत आहे. आतापर्यंत 2 हजार 976 शिक्षकांपैकी 2 हजार 461 शिक्षकांचीच कोरोना चाचणीही पूर्ण झालेली आहे. वैभववाडी आणि वेंगुर्ले या दोन तालुक्‍यांतील सर्व शिक्षकांची कोरोना टेस्ट पूर्ण झालेली आहे. मात्र, कणकवलीतील जास्तीत जास्त शिक्षकांची कोरोना टेस्ट शिल्लक राहिली आहे. 

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग विभागातर्फे पाचवी ते आठवी या वर्गाचा तालुकानिहाय कोरोना पार्श्वभूमीवर दैनंदिन शाळा अहवाल मागविण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. 27 पासून राज्यभरात पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना प्रादुर्भाव असताना शासनाकडून शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव कमी झाल्याने काही मुलांना सूचना देत पालकांनी शाळेत पाठविण्यास सुरुवात केली आहे; मात्र विद्यार्थ्यांचा पूर्ण प्रतिसाद मिळत नसलेला दिसून येत नाही. पाचवी ते आठवीमध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत 28 हजार 159 एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर 28 ला त्यातील 15 हजार 88 एवढ्या विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहिले होते. यातील जवळपास 13 हजार विद्यार्थी शाळेत हजर न राहिल्यामुळे पालकांच्या मनात अद्यापही कोरोनाची भीती असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. 

अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. पाचवी ते आठवी या वर्गावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची एकूण संख्या 2 हजार 976 एवढी आहे. यापैकी 2 हजार 461 एवढ्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 695 एवढी असून 683 एवढ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. त्यातील यापूर्वी एक शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. 

एकीकडे कोरोना लस जिल्ह्यात दाखल झाली असून, ती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेले काही दिवस कमी झालेला दिसून आला. मात्र, असे असले तरी जिल्ह्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण सापडत नसल्याने दुसरीकडे चिंतेचे वातावरणही कायम आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत कसे पाठवणार, हा प्रश्‍न पालकांपुढे अद्यापही आहे. 

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या 896 वर्गाच्या शाळा आहेत, त्यापैकी 735 शाळांना कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, या सर्व शाळांमध्ये पूर्ण प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला नसल्याचे दिसून आले. जवळपास 52 ते 53 टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहिले होते. शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाविषयक काळजी घेऊन मास्क व सॅनिटायझरचा वापर करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला होता. कमी पटसंख्येमुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसविले होते. शिक्षकांची कोरोना टेस्ट बऱ्यापैकी करण्यात आली. 
जिल्ह्यातील वेंगुर्लेमध्ये 402 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर देवगडमधील 356 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कणकवलीमधील 366 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

मालवणमधील 363 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. अशा 4 तालुक्‍यांत सर्वाधिक शिक्षकांच्या कोरोना टेस्ट झाल्या. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक 624 एवढे शिक्षक असून आतापर्यंत फक्त 366 एवढ्याच शिक्षकांची कोरोना टेस्ट झालेली आहे. त्यातील तब्बल 258 शिक्षकांची अद्यापही कोरोना टेस्ट बाकी आहे. ही विचार करण्यासारखी बाब आहे. इतर तालुक्‍यांच्या तुलनेत ही संख्या बरीच कमी आहे. याआधी जिल्ह्यात कोरोना कालावधीत 27 शिक्षक पॉझिटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह आलेल्या कुडाळ तालुक्‍यातील 12 शिक्षक पूर्ण पॉझिटिव्ह आले होते. मालवणमधील पाच शिक्षक आणि कणकवलीतील सहशिक्षक याआधी पॉझिटिव्ह आले होते; मात्र त्यातील बरेच शिक्षक हे आता कोरोनामुक्त झालेले आहेत.

गेल्या काही आठवड्यांमध्ये कोणत्याही शिक्षकाला कोरोनाची बाधा झालेली नाही. शाळा अध्यापनावर परिणाम होऊ नये, यासाठी तसेच मुलांना धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनासह अध्यापनाचे कार्य करताना बाधा होऊ नये, शिक्षकही आपली योग्यप्रकारे काळजी घेत आहेत. अध्ययन-अध्यापनाचे कार्य सुरू होण्यासाठी मुलांची हजेरी शाळेसाठी आवश्‍यक आहे. शिक्षण विभागाकडे 28 ला नोंद झालेल्या माहितीनुसार पाचवी ते आठवीचे 15 हजार 88 विद्यार्थी हजर राहिले होते. 

*तालुका*शिक्षक*टेस्ट झालेले 
*सावंतवाडी*380*289 
*वेंगुर्ले*402*402 
*देवगड*389*356 
*दोडामार्ग*170*162 
*कणकवली*624*366 
*कुडाळ*448*332 
*मालवण*372*363 
*वैभववाडी*191*191 
 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT