राजापूर ः भाजपचे नगरसेवक गोविंद चव्हाण यांचे शिवसेनेमध्ये स्वागत करताना आमदार डॉ. राजन साळवी.  sakal
कोकण

भाजपला दे धक्का: राजन साळवींनी बांधले चव्हाणांच्या हातात शिवबंधन

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : भाजपचे एकमेव नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी भाजपला रामराम ठोकताना शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला असून त्यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधत आमदार डॉ. राजन साळवी यांनी पक्षप्रवेश देत स्वागत केले. या वर्षअखेरीला येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूका रंगणार असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीमध्ये चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून शिवसेनेने आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाच्यावेळी आमदार साळवी यांच्यासह तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, पंचायत समिती सभापती करुणा कदम, संतोष हातणकर, शहर संघटक जितेंद्र मालपेकर, महिला शहर आघाडी वीणा विचारे, युवासेना शहर अधिकारी प्रज्योत खडपे, नगर पालिकेतील शिवसेना गटनेता विनय गुरव, नगरसेवक अनिल कुडाळी, सौरभ खडपे, नगरसेविका शुभांगी सोलगावकर, माजी नगरसेवक अभय मेळेकर, कार्यालय प्रमुख मधु बाणे आदी उपस्थित होते.

या वर्षअखेरीला होणार्‍या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे ढोल आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चोबांधणीला सुरवात केली आहे. त्याच्यातून आज भाजपचे नगरसेवक श्री. चव्हाण यांनी आमदार डॉ. साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या समवत निनाद शिर्सेकर, नेहा चव्हाण, संपदा वाघरे, जयश्री म्हादये, स्मिता चिंबुलकर, वैशाली पावसकर, मृण्मयी चव्हाण, संजय मोहीते, साईराज चव्हाण, चैतन्य शेट्ये, तन्मय शिवलकर, समीर नावेलकर आदींचा समावेश होता.

पालिकेत होते भाजपचे एकमेव सदस्य

सतरा नगरसेवक संख्या असलेल्या राजापूर नगर पालिकेमध्ये गोविंद चव्हाण हे भाजपचे एकमेव नगरसेवक होते. गेली चार वर्ष ते सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत होते. मात्र, विकासकामांसाठी निधीची तरतूद आणि मंजूरीवरून त्यांचे सत्ताधार्‍यांशी मतभेद झाले. अन् त्याच्यातून त्यांनी सत्ताधार्‍यांची साथ सोडली होती. आता त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पालिकेमध्ये भाजपचा एकही नगरसेवक राहीलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT