कोकण

मुख्यमंत्री ग्रामसडकच्या कामात सिंधुदुर्गात भ्रष्टाचार 

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून रस्त्याची कामे झाली; मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. अंदाजपत्रकानुसार कामे झालेली नाहीत. या कामात काही अधिकारीच ठेकेदाराचे पार्टनर आहेत असा गंभीर आरोप सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी केला. झालेल्या कामाचा दर्जा तपासूनच जिल्हा परिषदेने असे रस्ते ताब्यात घ्यावेत असा ठराव आजच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला. 

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, सभापती जेरॉन फर्नाडीस, डॉ. अनिषा दळवी, अंकुश जाधव, पल्लवी राऊळ, सदस्य सतीश सावंत, अमरसेन सावंत, राजेंद्र म्हापसेकर, विष्णूदास कुबल, संतोष साटविलकर, रेश्‍मा सावंत आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यावधी रूपये खर्चुन रस्त्याची कामे झाली; मात्र झालेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. सद्यस्थितीत अनेक रस्ते खराब झाले आहेत; मात्र या कामावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे भ्रष्टाचारही झाला आहे. या कामात काही अधिकारीच ठेकेदाराचे पार्टनर असल्याचा आरोप सदस्य म्हापसेकर यांनी केला. तर या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली. जिल्हा परिषदेने असे रस्ते ताब्यात घेताना कामाचा दर्जा तपासावा तोपर्यंत रस्ते ताब्यात घेवू नयेत असा ठराव घेण्यात आला. 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी नळयोजनेची कामे अनेक वर्षापासून अर्धवट स्थितीत आहेत. अशा कामांची चौकशी करून ज्या कामामध्ये झालेल्या कामापेक्षा अधिक निधी खर्च झालेला आहे अशा कामाच्या ठेकेदारावर व संबंधीत ग्रामीण पाणीपुरवठा समितीच्या ठेकेदारावर व संबंधीत ग्रामीण पाणीपुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती सभेत देण्यात आली. यावर संबंधीतांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्यापेक्षा तेथील लोकांना पाणी कसे देता येईल यादृष्टीने उपाययोजना करा अशी सुचना सदस्य सतीश सावंत यांनी प्रशासनाला केली. 

शौचालयांना दुर्गंधी नको 
स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2 ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबत बोलताना सतीश सावंत यांनी जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवा, स्वच्छता स्पर्धा घ्याव परंतु केवळ शौचालयाची रंगरंगोटी करणे म्हणजे स्वच्छता नाही. शौचालयामध्ये दुर्गंधी येता कामा नये. या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविताना उपाययोजना करा अशी सुचना केली. 

जास्त पटाच्या शाळांना विशेष दर्जा द्या 
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मोठ्या पटसंख्येच्या शाळांना विशेष दर्जा प्राप्त होण्याच्या दृष्टीने संबंधीत शाळांमध्ये सोयीसुविधा निर्माण करा. जेणेकरून अन्य शाळेतील मुलांनी त्या शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. कसाल प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये 150 हून अधिक पट आहे. त्यामुळे या शाळेकडे अधिक लक्ष द्या. मोक्‍याच्या ठिकाणी असलेली शाळा दर्जेदार होण्याच्या दृष्टीने लक्ष द्या अशी सुचना सदस्य सतीश सावंत यांनी आजच्या स्थायी सभेत केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT