Covid Care Center in all eight talukas of Sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात `सीसीसी`बाबत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांमध्ये कोविड केअर सेंटर अर्थात "सीसीसी' उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांनी दिली. केंद्र तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्षणे नसलेले आणि कमी प्रमाणात लक्षणे असलेल्या रुग्णांना कोवीड केअर सेंटर (सी.सी.सी.) मध्ये ठेवण्यात येत असल्याचे ते म्हणाल्या. 

ज्यांना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत, अशा रुग्णांना डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर (डी. सी. एच.सी.) मध्ये व ज्यांना उपचारांची जास्त गरज आहे, अशा मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे अशा रुग्णांना डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल (डी.सी.एच) मध्ये ठेवण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. 

सर्व तालुक्‍यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये एक ग्रामिण रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी किंवा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे नोडल अधिकारी हे रुग्णांची दररोज आरोग्य तपासणी करतील.

तर एक बी.ए.एम.एस डॉक्‍टर पूर्णवेळ कार्यरत असणार आहेत. तसेच या ठिकाणी ऑक्‍सिजन सिलिंडर, पल्स ऑक्‍सिमीटर, रुग्णवाहिका, पीपीई किट, एन 95 मास्क या सर्व सोयी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उपचारा दरम्यान कोविड केअर सेंटरमधील रुग्णांमध्ये काही गंभीर स्वरुपाची लक्षणे उद्‌भवल्यास त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटरसाठी सर्व तालुक्‍यातील तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी जागा निश्‍चित करुन ही केंद्र उभारली आहेत. 

स्वयंसेवी संस्थाना आवाहन 
कोवीड केअर सेंटर प्रत्येक तालुक्‍यात उभारण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच इतर संस्थांनी पुढाकार घ्यावा. खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनीही या सेंटरमध्ये आपली सेवा द्यावी, स्वयंसेवकांनी सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहेत. या सेंटरमध्ये सेवा देऊ इच्छीणाऱ्यांनी डॉ. लक्ष्मण दुर्गवाड यांच्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT