कोकण

सिंधुदुर्गात मुलांसाठी सौंरक्षण कवच : उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर (Covid Center) उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. प्लाझ्मा थेरपी मशिनसाठी (Plasma Therapy Machine) २५ लाखांची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Covid Center will be set up for children information by uday samant

सामंत यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अतिशय घातक आहे. याचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. तेथे दाखल होणाऱ्या लहान मुलांना अगदी घरच्यासारखी वागणूक दिली जाईल.’’

ते म्हणाले, ‘‘प्लाझ्मा थेरेपीचे मशिन जिल्ह्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर २५ लाखांची तरतूद मशिनसाठी केली आहे. आता या थेरेपीबाबत मतमतांतरे असली तरी त्याचा भविष्यात नक्कीच जिल्ह्यातील रुग्णांना फायदा होईल. लॉकडाउनला प्रतिसाद देणाऱ्या जिल्हावासीयांचा आभारी आहे. त्यामुळे रुग्ण कमी होण्यास मदत होते. कोविड रुग्णांची वाढलेली संख्या भविष्यात कमी होईल.’’

सामंत म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासनाने ‘माझा सिंधुदुर्ग, माझी जबाबदारी' मोहीम राबवली. त्यात दोन लाख ९० हजार १२ लोकांपर्यंत जाऊन तपासणी करण्यात आली. त्यात ५६ जण पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्यावर तत्काळ उपचार झाले. मोहीम ४० टक्के पूर्ण असून, ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे. लशींचा तुटवडा आता राहाणार नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचतील. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न आहेत. येत्या काळात शिक्षकांना व फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांचे लवकरच लसीकरणाच्या प्रशासनाला सूचना आहेत.’’

लॉकडाऊनवर बोलणे टाळले

लॉकडाऊनची मुदत शनिवार (ता. १५) ला संपणार आहे. लॉकडाउन वाढवणार का, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. या संदर्भात आजतरी मी त्यावर काही भाष्य करू शकत नाही, असे म्हणत श्री. सामंत यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले.

Covid Center will be set up for children information by uday samant

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT