कोकण

एकाच कुटुंबात मुलापाठोपाठ वडिलांचाही मृत्यू; मालवणात हळहळ

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : शहरातील एका कुटुंबात मुलापाठोपाठ वडिलांचाही (Father and Sun Covid 19) कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३४ वर्षीय मुलाचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला तर आज त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा दुसरा मुलगा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

covid died case in sindhudurg kokan covid 19 marathi news

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडविला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असून कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्याही मोठी आहे. शहर आणि तालुक्‍यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असून शहरात देखील कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा- कोरोनाने जाॅब गेलाय! या योजनेचा लाभ घेतला का?

शहरातील एका भागातील युवकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता मुलगाच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या ८० वर्षीय वडिलांना हा धक्का सहन झाला नाही. मुलाच्या मृत्यूनंतर चार-पाच दिवस त्यांनी अन्नपाणी सोडले. त्यातच त्यांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने शुक्रवारी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. तर घरातच दुपारी १२.३० वाजता त्यांनी प्राण सोडला. कोरोनाचे नियम पाळून पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी त्यांच्यावर येथील बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded News: पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडून मागितले पैसे, पोलिसाचं निलंबन

Solapur Flight Ticket Price: मुंबईला जाण्यासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी मोजले १८ हजार; उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग केल्याने जादा दर; विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

Solapur Municipal Corporation: चाळीतील १० हजार जणांना हक्काची घरे देण्याचा संकल्प; भैय्या चौक, रामलाल चौकात साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करणार

Kolhapur Gokul : भैय्या, आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही; सतेज पाटील : सरकार म्हणंल तसंच ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घडतंय 

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

SCROLL FOR NEXT