कोकण

ऐकावं ते नवलचं! रत्नागिरीत 15 किलो खेकड्याची चोरी

सकाळ वृत्तसेवा

तर ही चोरी आहे खेकड्यांची.

रत्नागिरी: रत्नागिरी शहराध्ये एका अनोख्या चोरीची जोरदार चर्चा सुरू आहे. लाखोची रोकड, दागिने अशा मौल्यवान वस्तूंची ही चोरी नाही, तर ही चोरी आहे खेकड्यांची. आश्चर्य चकीत झालात ना, पण हे खरे आहे. चेन्नईच्या वरिष्ठ संशोधन फिलो केंद्रीय निमखारे मत्स्य संवर्धन संस्थेअंतर्गत असलेल्या परटवणे येथील युनिटमध्ये ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने पुर्ण तयार झालेले १२ हजार किमतीचे ३०० ते ५०० ग्रॅम वजनाचे १५ किलो खेकडे लांबविले आहेत.

आखाडीच्या पार्श्वभूमीवर खवय्यांनी या खेकडा संवर्धन केंद्रावर डल्ला मारल्याची चर्चा आहे. शहर पोलिस ठाण्यासह शहरात या चोरीची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातील परटवणे येथे चेन्नईच्या वरिष्ठ संशोधन फिलो केंद्रीय निमखारे मत्स्य संवर्धन संस्थेअंतर्गत खेकडा संवर्धन केंद्र आहे. या तलावातून २५ ते २६ जुलै दरम्यान अज्ञात इसमाने या खेकड्यांची चोरी केल्याचा संशय आहे. खेकडे पुर्ण तयार झाले असून ३०० ते ५०० ग्रॅम वजनाचे होते. एकूण १५ किलो खेकडे अज्ञातांनी लांबविले आहेत. तशी तक्रार केंद्राचे व्यवस्थापक श्वेता पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात ही तक्रार दिली आहे.

बॉक्समध्ये ठेवण्यात येणाऱ्या खेकड्यांना रोज खाद्य घालण्यात येते. तेव्हा हा प्रकार लक्षात आला. माहितगाराने ही चोरी केल्याची चर्चा आहे. या अजब चोरीमध्ये तब्बल १२ हजार रुपये किंमती खेकडे गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. येत्या रविवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे आखाडी साजरी करण्यासाठी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस असल्याने माहितीगार खवय्यांनी ही चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

SCROLL FOR NEXT