कोकण

क्राईम

CD

गांजा प्रकरणातील सुत्रधार पडद्याआड

खेर्डीतील प्रकरण ; संशयितेकडून मोबाईलसह साहित्य ताब्यात

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ५ ः खेर्डी येथे गांजाविक्रेता सापडल्यानंतर सावर्डे येथून गांजा पुरवठा करणाऱ्या संशयित मिनाक्षी जयस्वाल हिच्याकडून सुमारे ६ किलो गांजा जप्त केला; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात तिने हा गांजा कोठून आणला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. संबंधित महिलेचा मोबाईल व अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आलेले नाही.
सावर्डे खोतवाडी येथील रहिवासी असलेली मिनाक्षी जयस्वाल हिच्या घरातून १ लाख १८ हजार १६० रुपये किंमतीचा तब्बल ५ किलो ९०८ ग्रॅम वजनाचा गांजा सावर्डे पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर जयस्वाल हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत आणखी दोन दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी तिचा मोबाईल व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले असून, त्या आधारे तपास केला जात आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही पडद्याआड आहे. ६ किलो गांजा घरात ठेवून ती विविध ठिकाणी पानपट्टीधारक व अन्य विक्रेत्यांना पुरवत होती. त्यामुळे या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे अशी माहिती पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT