कोकण

क्राईम

CD

दोन दुचाकी अपघातात महिला ठार

खानु येथील घटना; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
पाली , ता. १५ : मुंबई गोवा महामार्गावर पाली नजीकच्या खानू येथे पेट्रोलपंपाच्या समोर दोन दुचाकींची धडक होऊन झाली. या अपघातात एक महिला ठार झाली. तर दोघे जण जखमी झाले. अरुणा सिताराम कोलगे ( रा. येरवंडे ता. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात दोन्ही दुचाचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ती पाली पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सुरळीत केली.
पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर पाली नजीकच्या खानू गावच्या हद्दीत खानु पेट्रोलपंपासमोर काल (ता. १४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गौरव काशिनाथ कडू हा दुचाकीने वडील काशिनाथ भिवा कडू यांना घेऊन पालीहून मठाच्या दिशेने जात होता. पेट्रोल पंपाच्यासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूने येणारे दुचाकी पेट्रोल पंपात जात असताना उजव्या बाजूने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. यामध्ये दुसऱ्या दुचाकी वरील अरुणा सिताराम कोलगे ( रा. येरवंडे ता. लांजा) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ पाली ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात गौरव काशीनाथ कडू, काशिनाथ भीवा कडू , (दोघेही रा. मठ कडूगाव, सिताराम यशवंत कोलगे रा. येरवंडे) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती सिताराम कोलगे (रा. येरवंडे) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्र येथे दिल्यावरून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताचा अधिक तपास उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT