Crime against this company in Kherdi in the case of death of a worker 
कोकण

कामगाराच्या मृत्यु प्रकरणी खेर्डीतील या कंपनीवर गुन्हा... 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिल कंपनीच्या मेंटेनेसचे काम करीत असताना सिमेंटच्या पत्र्यावरून पडून एका कामगाराचा काही दिवसांपूर्वी पडून मृत्यू झाला. याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकासह गुप्ता फॅब्रिकेटर्स अँड फायबर वर्क्सचेचे मालक व मेंटेनन्सचे मॅनेजर या तिघांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी दिली आहे. यानुसार गुप्ता फॅब्रिकेटर्स अँड फायबर वर्कसचे मालक ओमप्रकाश गोरख गुप्ता (रा. गुजरात), मेंटेनेस इंजिनियर पपाई कनाई सिंगा ( पश्‍चिम बंगाल), थ्री एम पेपर कंपनीचे व्यवस्थापक हसमुख मोरारजी संगोई (रा. चिपळूण), अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. तर जितेंद्र दीनानाथ प्रसाद असे मृत कामगाराचे नाव आहे. हा कामगार 19 एप्रिल रोजी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास हा अन्य कामगारांसमवेत थ्री एम पेपर मिल या कंपनीचे मेंटेनन्सचे काम करण्याकरता सिमेंटच्या पत्र्याच्या शेड वरून चालत जात असताना पायाखाली सिमेंटचा पत्रा फुटल्याने तो 35 फूट खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. या मध्ये या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यामुळे गुप्ता फॅब्रिकेटर्स अँड फायबर वरचे मालक ओमप्रकाश गुप्ता यांनी आवश्यक ती साधने न पुरविल्याने तर मेंटेनन्स इंजिनीयर पपई सिंगा व थ्री एम पेपर मिल या कंपनीचे व्यवस्थापंक हसमुख संगोई या दोघांनी या कामगाराला दहा मीटर उंच व साधारण 175 मीटर लांब सिमेंटच्या पत्र्याच्या शेड वर काम करताना सेफ्टी बेल्ट करण्याकरता आवश्यक ती व्यवस्था न पुरवता तसेच काम करण्याकरता शेडवर चढण्याकरता शिडी अगर इतर व्यवस्था न करता त्याला कंपनीच्या मेन बिल्डिंगच्या टेरेसवर चढून पुढे कंपनीच्या शेड वर काम करण्यासाठी साधारणत 100 मीटर अंतर शेडवर जाण्यास सांगितले त्यावेळी चालत असताना या कामगाराच्या पायाखालील सिमेंटचा पत्रा फुटल्याने सदर चा अपघात घडलेला आहे. तरी या प्रकरणी या तिघांविरोधात कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT