Crime against four persons who did not get license from Mumbai 
कोकण

मुंबईवरून परवाना न घेता आलेल्या चौघांवर गुन्हा 

सकाळवृत्तसेवा

वैभववाडी ( सिंधुदुर्ग) - कोणताही परवाना न घेता मुंबईहुन दुचाकीने कोकिसरे येथे आलेल्या चौघांवर पोलीसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या चौघांमध्ये एका महिलेचा समावेश असुन चौघांनाही संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. 

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अनिकेत अनंत गुरव, नरेंद्र सुर्यकांत गुरव, (दोन्ही रा. मालाड) राकेश रघुनाथ गुरव, प्रिया राकेश गुरव, (रा. नायगाव, मुंबई) यांचा समावेश आहे. कोकिसरे येथील हे चौघेजण दुचाकीने मुंबई - गोवा महामार्गाने खारेपाटण येथे आले. कोणताही परवाना नसल्यामुळे खारेपाटण तपासणी नाक्‍यावरील पोलीसांनी त्यांना परत मुंबईत जाण्यास सांगीतले. परंतु त्यांनी आडमार्गाचा वापर करीत आपले मुळ गाव गाठले. ही माहीती गावातील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना समजल्यानतंर त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहीती दिली. प्रशासनाने या चौघांना सांगुळवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले. 

असेच गुन्हे दाखल होणार 
आडमार्गाने विनापरवाना तालुक्‍यात आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना येणाऱ्या लोकांवर यापुढे देखील गुन्हे दाखल केले जातील.त्यामुळे कुणीही विनापरवाना येऊ नये असे आवाहन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT