Crime Against Truck Driver For Bringing Service Man From Mumbai 
कोकण

आंब्याच्या गाडीतून चाकरमान्यांना आणल्याप्रकणी गुन्हे दाखल 

सकाळवृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - आंब्याच्या गाडीतून मुंबईतून चाकरमान्यांना गावी आणल्याप्रकरणी चौघांवर येथील पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या दोन पीकअप गाड्याही जप्त केल्या आहेत. संशयित आरोपींना नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे. यातील दोघांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

आंबा वाहतुकीचा पास घेऊन मुंबईला आंब्याच्या गाड्या घेऊन जाणाऱ्यांनी यापूर्वी देवगडमध्ये मुंबईतून व्यक्तींना गावी आणल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. त्यामुळे सर्वच ठिकाणी आंबा वाहतुकीच्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यात येत होते. यातच आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ व सर्जेकोट या दोन गावांमध्ये मुंबईतून काही व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांचा शोध घेतला.

यात आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथील महेश बाळू सांडव याने आंबा वाहतुकीची पिकअप गाडी (एम. एच. 07 एजे-0324) मधून भाऊ विष्णू बाळू सांडव याला 28 मार्चला येथे आणले तर सर्जेकोट येथील गोपाळ जयवंत कवटकर याने गाडी (एम. एच. 07 पी-2195) मधून मुलगा ओंकार गोपाळ कवटकर याला 6 ते 8 एप्रिल या कालावधीत येथे आणले. संबंधितांकडे याप्रकरणी चौकशी करून काल (ता.8) रात्री उशिरा या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या दोन्ही पिकअप गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधितांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे. ज्यांना मुंबईतून आणले त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर, सुभाष शिवगण हे अधिक तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

SCROLL FOR NEXT