https://www.esakal.com/kokan/medical-college-ratnagiri-establish-said-uday-samant-konkan-417790 
कोकण

..म्हणून मीच शौर्याला बुडवून मारले ; आईच्या निर्दयी उत्तराने पोलिसही चक्रावले

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : दुसरी मुलगी झाली, म्हणून आईनेच स्वतःच्या मुलीला बुडवून ठार मारल्याची घटना वहाळ येथे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. या घटनेने पोलिसही चक्रावले आहेत. आई स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अशा पद्धतीने कशी काय मारू शकते? आईच्या या सैतानी कृत्याने पोलिसदेखील बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपासाला वेग दिला असून संपूर्ण खापले कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करण्यास सुरवात केली आहे.

तालुक्‍यातील वहाळ घडशीवाडी येथे एक महिन्याची शौर्या प्रवीण खापले या बालिकेचा घरातील बाथरूममध्ये पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले; परंतु डीवायएसपी सचिन बारी यांनी सूत्रे हाती घेऊन तपासाला वेग दिला आणि सत्य समोर आले. सुरवातीला कोणीतरी पाण्याच्या बादलीत शौर्याला आणून टाकले, असा कांगावा करणाऱ्या शिल्पा प्रवीण खापरे हिने पोलिसांच्या समोर सत्य सांगायला सुरवात केली आणि दुसरी मुलगी झाली, म्हणून मीच तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारले, अशी कबुली आई शिल्पा हिने पोलिसांना दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून शिल्पा खापरे हिला अटक केली. १२ मार्चपर्यंत तिला पोलिस कोठडी मिळाली आहे.

वहाळ परिसरात सुरू असलेल्या चर्चेचा कानोसा घेता, प्रत्यक्षात शौर्या हिचे काही दिवसांपूर्वीच बारसे झाले होते. अत्यंत धुमधडाक्‍यात वडील प्रवीण याने बारसे करून शौर्या हे नाव दिले होते. परंतु शौर्याला कावीळचा आजार झाला होता. तिला सावर्डे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या उपचाराला हजारो रुपये खर्च करून वडील प्रवीण याने घरी आणले होते. ती पूर्ण बरी व्हावी आणि नंतरच आपण नोकरीला जावे, हा उद्देश ठेवून प्रवीण खापले यांनी आपली रजादेखील पाच दिवस पुढे वाढवली होती. त्यामुळे वडिलांनी तिला पूर्णपणे स्वीकारले होते, हे पोलिस तपासात पुढे आले आहे. मग असे का घडले, या प्रश्नाने पोलिसांना देखील बुचकळ्यात टाकले आहे.

घडशीवाडीतील काहींना पाचारण

सोमवारी (८) वहाळ घडशीवाडी येथील काही लोकांना बोलावून डीवायएसपी कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. आई शिल्पा एकटीच नव्हे तर तिच्यामागे कोणीतरी असले पाहिजे, असा पोलिसांचा संशय आहे. सावर्डे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळ स्वतः या प्रकरणात तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: पडिक्कलची चार सामन्यात तिसरी सेंच्युरी; सर्फराज खान-ऋतुराज गायकवाडचीही वादळी शतके; टीम इंडियात कोणाला संधी?

Pimpalwandi Leopard News : पिंपळवंडीत बिबट्याचा थरार संपला! थर्मल ड्रोनच्या निगराणीनंतर अखेर 'सहा वर्षांचा' बिबट्या पिंजऱ्यात कैद

New IPO : IPO अलर्ट! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! वर्षातील अखेरचा IPO आजपासून सुरू; जाणून घ्या प्राइस रेंज, GMP आणि डिटेल्स

Navi Mumbai Airport: विमानसेवा सुरू, नेटवर्क गायब! नवी मुंबई विमानतळाची दूरसंचार कंपन्यांवर दरवाढ

मी चुकले! या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाहीये... जितेंद्र जोशीच्या पत्नीने मागितली माफी; कारण...

SCROLL FOR NEXT