crime case in dapoli postmaster lady dead in ratnagiri 
कोकण

पोस्टमास्तर महिलेची कार्यालयातच आत्महत्या; दापोलीतील घटनेनं खळबळ

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील मुरुड येथील पोस्टमास्तर महिलेने पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दापोली पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद केला आहे. पीर्वी सुशील तुरे (वय २५, रा. मुरुड-दापोली) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (२६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पूर्वी यांनी पती सुशील तुरे यांना पोस्टाचे पैसे देवाणघेवाण करण्याचे मशिन दाखविण्यासाठी दापोली पोस्ट कार्यालयात जात असल्याचे सांगून त्या घराबाहेर पडल्या होत्या; मात्र त्या दापोली येथे न जाता मुरुड पोस्ट कार्यालयात आल्या व त्यांनी पोस्ट कार्यालयातील लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रात्री साडेदहा वाजता उघड झाला. या प्रकाराची खबर त्यांचे पती सुशील तुरे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल मोहन कांबळे करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT