crime case in kokan one youth died in accident in forest dabhol 
कोकण

कोकण : बंदुकीची गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील साकुर्डे येथील देवरहाटीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. दापोली पोलिस या मृत्यूची चौकशी करत आहेत. बुधवारी (३१) दुपारी ही घटना घडली. 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साकुर्डे गणेशनगर (जंगमवाडी) येथील विनोद मनोहर बैकर (वय ३३) हा ३१ मार्चला दुपारी बंदूक घेऊन देवरहाटी भागातील जंगलात शिकारीसाठी गेला होता. शिकारीसाठी जात असताना त्याने वाडीतील एका तरुणाला शिकारीसाठी येतोस का, असे विचारले. मात्र, त्या तरुणाने नाही सांगितले. त्यामुळे विनोद एकटाच शिकारीला गेला. 

त्यानंतर दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास देवरहाटी भागातून बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकू आला. त्यामुळे या तरुणाने विनोदला हाका मारल्या. मात्र, विनोदने कोणताच प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्याने विनोदचा शोध घेतला असता त्याला विनोद रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याच्या बेंबीच्या खाली गोळी लागली होती. यानंतर गावकरी या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत विनोद मृत झाला हेता. विनोद हा विवाहित असून त्याला दोन मुले, आई असा परिवार आहे. 

विनोद एकटाच शिकारीसाठी कसा गेला, त्याच्या ताब्यात असणारी सिंगल बोअरची बंदूक कोणाच्या मालकीची आहे, याचा तपास दापोली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत. विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरीत नेण्यात आला आहे. दापोली पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ प्रमाणे तसेच भादंवि ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी श्‍वान पथक व फोरेन्सिकची टीम दापोलीत दाखल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT