crime case in sadvali police arrested to related man in ratnagiri for crime 
कोकण

कोकणात बिबट्याची नखे, पंजे, दात जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : बिबट्याच्या नखांसह दोन पंजे व दोन दात विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने संगमेश्‍वर तालुक्‍यातील ताम्हाने येथील एकास सोमवारी सायंकाळी कानरकोंड येथे पकडले. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस नाईक प्रवीण कृष्णा खांबे यांनी या घटनेसंदर्भात फिर्याद दाखल केली. यावरून देवरुख पोलिसांनी संतोष काशिनाथ पड्याळ (वय ५०, रा. ताम्हाने) याला ताम्हाने ते वांद्री मार्गावरील कानरकोंड येथे अटक केली. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीच्या बिबट्याच्या नखांसह दोन पंजे, १० हजार रुपये किमतीचे बिबट्याचे दोन दात, ३५ हजार रुपये किमतीची ॲक्‍टिव्हा दुचाकी व ५०० रुपये किमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंचा दावा तथ्यहीन, कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबत प्रशासनाचं स्पष्टीकरण; बावनकुळेंकडे सोपवला अहवाल

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्ग आता थेट रेडी बंदर अन् मुंबई-गोवा हायवेला जोडणार! MSRDC चे पुन्हा सर्व्हेचे आदेश, आमदार केसरकरांनी दिली मोठी अपडेट

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींचे रांचीमध्ये आंदोलन; विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो विधानसभेच्या घेराव मोर्चात सहभागी

Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? तुकाराम मुंढेंनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव; किस्सा ऐकून सगळेच हसले

MS Dhoni Pension : सहा वर्षांपूर्वी निवृत्ती, IPL मध्ये अजूनही खेळतोय महेंद्रसिंग धोनी! भारताच्या माजी कर्णधाराला पेन्शन किती?

SCROLL FOR NEXT