कोकण

परप्रांतीय कामगाराचा खून; संशयिताच्या मुसक्या आवळण्यास बांदा पोलिसांना यश

निलेश मोराजकर

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील (sawantwadi tehsil) बांदा-गडगेवाडी (banda) येथे परप्रांतीय कामगार विश्वजीत मंडल याच्या खून प्रकरणी (crimecase) मुख्य सुत्रधाराच्या मुंबई (mumbai) येथे मुसक्या आवळण्यात बांदा पोलिसांना (banda police) यश आले आहे. खून केल्यानंतर उल्हासनगर-कल्याण येथे पळून गेलेल्या सुखदेव सोपान बारीक (वय २७, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. उल्हासनगर) याला मंगळवारी रात्री उशिरा बांदा पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून अटक केली.

संशयिताच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला अटक करण्यात आली आहे. संशयित सेंट्रिग कामगार असून तो उल्हासनगर येथे एका पुलाच्या कामावर होता. खून केल्यानंतर त्याच रात्री शनिवारी उशिरा रेल्वेने मुंबईच्या दिशेने पलायन केले. बांदा पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर आज सकाळी बांदा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. अवघ्या तीन दिवसांतच पोलिसांनीआरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले. सुखदेवने खुनाची कबुली दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, मुख्य सूत्रधार सुखदेव हा मयत विश्वजित यांच्याकडे ८ वर्षांपूर्वी सेंट्रिंग कामासाठी होता. मयत विश्वजित याची पत्नी व सुखदेव हे पश्चिम बंगालमधील (paschim bangal) एकाच गावचे रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांनी सुखदेव हा मुंबई येथे कामासाठी गेला. मात्र त्याचे विश्वजितच्या पत्नीशी प्रेमसंबंध सुरूच होते. या प्रेमात विश्वजित अडथळा ठरत होता. त्यासाठी त्याने विश्वजितचा काटा काढण्याचा प्लॅन केला. त्यानुसार शुक्रवारी (४) रोजी सकाळीच्या मांडवी एक्स्प्रेसने दुपारी तो मडगाव-गोवा येथे पोहोचला. गोव्यात त्याने विश्वजितला जीवे मारण्यासाठी लोखंडी टिकाव विकत घेतले. तेथून त्याने दीड हजार रुपये देऊन पायलट करून पेडणे-गोवा गाठले. पायलट चालकाने महाराष्ट्र हद्दीत येण्यास नकार दिला. तेथून त्याने डंपरला हात दाखवून रात्री बांदा गाठले. बांद्यात एका मंगल कार्यालयाच्या आवारात झाडाखाली तो झोपला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याने केलेल्या प्लॅनिंगनुसार विश्वजित राहत असलेले घर गाठले. तेथे त्याला बाहेरच्या खोलीत बोलाविले. त्याठिकाणी दोघांमध्ये बाचाबाची झाली. सुखदेवने सोबत आणलेल्या टिकावाने विश्वजितवर वार करून खून केला. खून केल्यानंतर सुखदेव फरारी झाला. रात्रभर तो बांदा शहरात लपून राहिला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याने बांदा शहरात ३०० रुपये देऊन पायलट ठरविला. तेथून त्याने मळगाव येथे जात रेल्वेने मुंबईत पलायन केले. बांदा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री उशिरा मुंबई येथे रवाना झाले.

मित्राला केला कॉल अन् जाळ्यात सापडला

बांदा पोलिसांनी सुखदेव याचा मोबाईल ट्रेस केला, त्याचे लोकेशन उल्हासनगर येथे मिळाले. त्याने मदतीसाठी आपल्या उल्हासनगर येथील रिक्षाचालक मित्राला तीन कॉल केले होते. पोलिसांनी मित्राचा नंबर मिळवत सर्वप्रथम त्याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार संशयित सुखदेव हा उल्हासनगर मधील उल्हासी नदीच्या लगत झोपडीत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पहाटे त्याठिकाणी सापळा रचला. मंगळवारी सकाळी सुखदेव आंघोळ करण्यासाठी झोपडीच्या बाहेर झाडाखाली आला असता, बांदा पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने जेरबंद केले. मंगळवारी रात्री उशिरा त्याला बांदा पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT